esakal | दीपशिखाला पाहिलयं?, किंबहूना पाहवचं लागेल...

बोलून बातमी शोधा

deepshikha nagpal
दीपशिखाला पाहिलयं?, किंबहूना पाहवचं लागेल...
sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडमधील अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांची रुपेरी पडद्यावर एंट्री झाली. मात्र त्या फार काळ बॉलीवूडमध्ये टिकाव धरु शकल्या नाहीत. त्यांच्या वाट्याला फार मोठ्या भूमिकाही आल्या नाहीत. फुटकळ स्वरुपाच्या भूमिका करुन त्यांनी आपली ओळख प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला खरा. मात्र त्यांना काही काळानं बॉलीवूडपासून माघार घ्यावी लागली. अभिनेत्री दीपशिखा नागपाल हिचे नाव अशा अभिनेत्रींमध्ये घ्यावे लागेल ज्यात ती थोडा काळ पडद्यावर होती मात्र त्यानंतर तिनं बॉलीवूडपासून लांब राहणे पसंद केले आहे.

तुम्हाला शाहरुखचा बादशहा चित्रपट आठवत असेल त्यात शाहरुखचा पाठलाग करण्यासाठी विमानात बसलेली दीपशिखा आपल्याला पडद्यावर दिसते. दीपशिखाची एंट्री टेलिव्हिजन क्षेत्रापासून झाली होती. ती तिच्या बोल्ड अंदाजासाठी फेमस होती. अजूनही तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

सध्या दीपानं तिच्या सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल केले आहेत. त्यामुळे तिच्या चाहत्यांना एक सुखद धक्का म्हणावा लागेल. तिचे हॉट फोटो म्हणजे तिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची पर्वणीच असते. तिचा तो ग्लॅमरस अंदाज त्यांना आवडतो.

दीपशिखाचे बोल्ड फोटो फॅन्सचं लक्ष वेधून घेत आहेत. त्याला चांगला प्रतिसादही मिळाला आहे. फॅन्सनं मोठ्या प्रमाणात तिच्या फोटोंना कमेंटही दिल्या आहेत. तिनं त्या फोटोंच्या माध्यमातून चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

ज्यावेळी तुम्ही दीपशिखाचे ते फोटो पाहता तेव्हा पाहतच राहता. अशावेळी दीपशिखाच्या वयाचा विसर पडल्यावाचून राहत नाही. दीपशिखाचे वय 43 वर्ष आहे. दीपशिखा आपल्या फिटनेससाठी प्रसिध्द आहे.

सध्याच्या घडीला प्रसिध्द असणा-या एखाद्या अभिनेत्रीपेक्षाही दीपशिखाचे फोटो जास्त व्हायरल होत आहेत. याचे कारण तिची वेगळी अदा आणि पोझ. ज्यापध्दतीनं तिनं हॉट फोटोशुट केले आहे त्यावरुन तिची पॅशन दिसुन येते.

दीपशिखाच्या नव्या काही प्रोजेक्टबद्दल सांगायचे झाल्यास ती आता काही मोजक्या मालिकांमध्ये दिसून येते. तसेच काही वेबसीरिजमध्येही तिनं अभिनय केला आहे. शाहरुख बरोबर कोयला चित्रपटात काम केले होते. त्यावेळी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.