KAALI Controversy: लीना मणिमेकलाईच्या अडचणी वाढल्या, दिल्ली कोर्टाचं समन्स

लीनाच्या विरोधात धार्मिक भावना दुखावल्याच्या अनेक तक्रारी दाखल केल्या गेल्या होत्या.
Delhi court issues summons to filmmaker Leena Manimekalai over Kaali Controversy
Delhi court issues summons to filmmaker Leena Manimekalai over Kaali ControversyGoogle

शॉर्ट फिल्म 'काली'(KAALI) च्या वादग्रस्त पोस्टरमुळे चर्चेत आलेली कॅनडात राहणारी भारतीय दिग्दर्शिका लीना मणिमेकलईच्या(Leena Manimekalai) अडचणी वाढताना दिसत आहे. लीनाच्या विरोधात धार्मिक भावना दुखावल्याच्या अनेक तक्रारी दाखल केल्या गेल्या आहेत. आता दिल्ली कोर्टानं(Delhi Court) लीना आणि या शॉर्ट फिल्मशी संबंधित अन्य काही जणांविरोधात समन्स जारी केलं आहे.(Delhi court issues summons to filmmaker Leena Manimekalai over Kaali Controversy)

Delhi court issues summons to filmmaker Leena Manimekalai over Kaali Controversy
'मी पुन्हा येईन!' कसा झाला ४० आमदारांचा गेम? लवकरच उलगडणार रहस्य...

लीनाचा सिनेमा 'काली' च्या पोस्टरवर मां कालीच्या पेहरावातील अभिनेत्री धुम्रपान करताना दाखवली आहे आणि तिच्या हतात LGBTQ कम्युनिटिचा झेंडा देखील देण्यात आला आहेत. सोशल मीडियावर या पोस्टरवरुन आणि व्हिडीओवरनं खूप वाद झाले आहेत. दिल्ली कोर्टाने लीना आणि अन्य काही जणांना ६ ऑगस्टला कोर्टात हजर राहण्यासाठी समन्स जारी केलं आहे. कोर्टानं लीनाची कंपनी टूरिंग टॉकीज मीडियो प्रायव्हेट लिमिटेडला देखील नोटिस जारी केलं आहे.

Delhi court issues summons to filmmaker Leena Manimekalai over Kaali Controversy
'बीवी के सरप्राइज से डर लगता है',जेलची हवा खाल्लेल्या Youtuber ची खंत

लीना मणिमेकलई विरोधात दिल्ली व्यतिरिक्त उत्तरप्रदेश,मध्यप्रदेश मध्ये देखील एफआयआर दाखल केली गेली आहे. कोर्टात कालीचे वादग्रस्त पोस्टर आणि व्हिडीओ प्रसारीत करण्यावर बंदी आणण्याची देखील मागणी केली होती. लीनाच्या या शॉर्ट फिल्मला कॅनडा येथील टोरंटोच्या आगा खान म्युझियम मध्ये अंडर द टेंट प्रोजेक्ट अंतर्गत रिलीज केलं गेलं होतं. पोस्टर वादानंतर कॅनडाच्या इंडियन हाय कमिशनने आक्षेप घेतल्यानंतर आगा खान म्युझियमने यासंदर्भात लेखी माफी मागितली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com