'दिल्ली क्राईम' बेस्ट ड्रामा, International Emmy Awards 2020

Delhi Crime Wins Best Drama Series International Emmy Awards 2020.jpg
Delhi Crime Wins Best Drama Series International Emmy Awards 2020.jpg

 मुंबई -वेबसीरीजच्या दुनियेत प्रेक्षकांच्या पसंतीस पडलेल्या ज्या काही मोजक्या वेबसीरीज आहेत त्यात 'दिल्ली क्राईम' चे नाव घ्यावे लागेल. रहस्य, थरार, क्राईम आणि उत्कंठावर्धक असलेल्या या वेबसीरीजला मोठ्या प्रमाणात चाहत्यांकडून प्रतिसाद मिळाला होता. एका पीडीतेवर होणा-या अत्याचाराच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी उघडलेली मोहिम हा या मालिकेचा प्रमुख विषय होता. नुकताच या वेबसीरीजला International Emmy Awards 2020 ने गौरविण्यात आले आहे.

प्राईम व्हिडीओची निर्मिती असणा-या फोर मोअर शॉटस प्लीझ वेबसीरीजली बेस्ट कॉमेडी सीरीज म्हणून नामांकन मिळाले आहे. 48 वा इंटरनॅशनल इमी अॅवॉर्डस हे ख-या अर्थाने भारतीय वेबसीरीजसाठी महत्वाचे ठरले आहे. त्यात नेटफ्लिक्सची प्रस्तुती असणा-या दिल्ली क्राईमला बेस्ट ड्रामाचा पुरस्कार देण्यात आला आहे.

रिची मेहता यांनी दिग्दर्शित केलेल्या या मालिकेत शेफाली शहा यांच्या अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यांनी त्यात साकारलेली दिल्ली पोलीस उपआयुक्ताची भूमिका गाजली होती. 2012 मध्ये दिल्ली मध्ये झालेल्या गँगरेपमध्ये एका पीडितेवर अमानुष अत्याचार करण्यात आले होते. त्यात फरार असणा-या आरोपींना गजाआड करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी घेतलेले परिश्रम, वेगाने फिरणारा तपास यावर ही मालिका आधारित होती.

मेड इन हेव्हन मालिकेत काम करणा-या अभिनेता अर्जुन माथुर याला बेस्ट अॅक्टरचे नामांकन मिळाले होते. कोरोनाच्या भीतीमुळे यंदा हा महोत्सव ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आला होता. इमी अॅवॉर्डच्या इतिहासात पहिल्यांदाच ऑनलाईन पध्दतीने हा महोत्सव पार पडला. प्रसिध्द निवेदक रिचर्ड काईंड यांनी या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. न्युयॉर्कमध्ये झालेल्या या पुरस्कार सोहळ्याला कुणीही प्रेक्षक उपस्थित नव्हते.

पुरस्कार मिळालेल्या मालिका त्यातील कलाकार यांची नावे पुढीलप्रमाणे, बेस्ट ड्रामा सिरीज दिल्ली क्राईम (भारत), बेस्ट कॉमेडी सिरीज - निनज्युम ता ऑहंडो (नो बडी लुकींग, ब्राझील), बेस्ट अॅक्ट्रेस - ग्लेंडा जॅक्सन, एलिझाबेथ इज मिसिंग (युनायटेड किंग्डम), बेस्ट अॅक्टर - बिली ब्रॅट ( रिस्पॉन्सिबल चाईल्ड, युनायटेड किंग्डम)

23 नोव्हेंबर रोजी ऑनलाईन हा पुरस्कार सोहळा पार पडला. मागील वर्षी भारताकडून मोठ्या संख्येने या पुरस्कारासाठी इंट्री पाठविण्यात आल्या होत्या. नेटफ्लिक्सची निर्मिती असलेल्या लस्ट स्टोरीज आणि सेक्रेड गेम्स या मालिकांना बेस्ट टीव्ही मुव्ही आणि मिनी सिरीज यासाठीचे नामांकन मिळाले होते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com