
रसिका सुनिलने गायलेल्या आणि अभिनय केलेल्या ‘तुम बिन मोहे’ या गाण्याला युट्युबवर चाहत्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे.
मुंबई- ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या प्रसिद्ध मालिकेतील शनाया या व्यक्तीरेखेमुळे अभिनेत्री रसिका सुनील घराघरात पोहोचली. शनाया म्हणजेच रसिका ख-या आयुष्यात कशी आहे याविषयी जाणुन घेण्याची सगळ्यांची उत्सुकता वाढली. आता हळुहळु रसिकाच्या चाहत्यांना माहित झालं आहे की रसिका उत्तम अभिनयासोबतंच तेवढं उत्तम गाते देखील. तसंच तिने नृत्याचं शिक्षण देखील घेतलं आहे. नुकतंच रसिका सुनिलने गायलेल्या आणि अभिनय केलेल्या ‘तुम बिन मोहे’ या गाण्याला युट्युबवर चाहत्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे.
हे ही वाचा: "यापुढे मी कृष्णापासून...", गोविंदाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय
रसिकाच्या या गाण्याची सोशल मिडियावर चांगलीच चर्चा आहे. याबाबत ती सांगते, “आशुतोष सोहोनीने खूप अगोदर एक चाल तयार केली होती. मी अमेरिकेत लॉस एन्जेलीस मध्ये सिनेमा या माध्यमाचं शिक्षण घेत असताना माझी आणि आशुतोषशी चांगली मैत्री झाली. त्याने माझं गायन तपासलं. मी शास्त्रीय संगीत आणि नृत्याचं शिक्षण घेतलं आहे. माझा आवाज योग्य असल्याचं लक्षात येताच त्यावर शब्द लिहिले गेले. मीच मग व्हिडिओचं स्क्रिप्ट लिहिलं. त्यात आम्हाला तिथेच अनुप कुलकर्णी या कॅमेरामनची ओळख झाली. सर्वांचाच एकमेकांवर पूर्ण विश्वास होता, त्यामुळे काम करणं सोपं झालं. न्यूयॉर्कचं वातावरण खूप चांगलं असल्याने तिथे आम्ही शूटिंग केलं.”
अभिनेत्री रसिका सुनिल सध्या मुंबईतच 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत शनायाची भूमिका साकारतेय. तर आशुतोष सोहोनी सध्या पुण्यात आहे. दोघे मिळून यानंतर अनेकदा अशी गाणी आणि इतर काही गोष्टी करणार आहोत मात्र सध्या दोघेही आपापल्या परीने काम करत असल्याचं तिने सांगितलं. रसिकाने आणखी एक गाणं नुकतंच गायलं आहे. इतकंच नाही तर ती मोठ्या पडद्यावर देखील लवकर झळकेल. नवीन वर्षात तिच्या काही मराठी सिनेमांच्या शूटिंगला सुरुवात होणार असल्याचं कळतंय.
majhya navryachi bayko fame rasika sunil sing a song netizens respond strongly