esakal | 'सरस्वती प्रसन्न असलेला शब्दप्रभू हरपला'; प्रवीण तरडे भावूक
sakal

बोलून बातमी शोधा

pranit kulkarni and pravin tarde

'सरस्वती प्रसन्न असलेला शब्दप्रभू हरपला'; प्रवीण तरडे भावूक

sakal_logo
By
स्वाती वेमूल

प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक, लेखक आणि गीतकार प्रणित कुलकर्णी Pranit Kulkarni यांचे निधन झाले. 'मुळशी पॅटर्न' Mulshi Pattern या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे Pravin Tarde यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित याबद्दलची माहिती दिली. प्रणित यांनी 'देऊळबंद' या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. त्याचप्रमाणे 'मुळशी पॅटर्न'मधील प्रसिद्ध 'आ रा रा खतरनाक' हे गाणं त्यांनी लिहिलं होतं. हे गाणं खूप गाजलं होतं. (deoolband director pranit kulkarni passes away pravin tarde wrote emotional post)

प्रवीण तरडेंची पोस्ट-

'माझा प्रणित दादा गेला. सरस्वती प्रसन्न असलेला शब्दप्रभू हरपला. गीतकार, लेखक, दिग्दर्शक प्रणित कुलकर्णीबद्दल लिहायला लागलो तर दिवस पुरायचा नाही, नंतर सविस्तर लिहिनंच. देऊळबंदला माझ्यासोबत लेखन, दिग्दर्शन आणि देऊळबंद, मुळशी पॅटर्न, सरसेनापती हंबीररावचा गीतकार. सरस्वती प्रसन्न असलेला शब्दप्रभू हरपला. आ रा रा खतरनाक, उन उन वठातून, आभाळा आभाळा गुरुचरीत्राचे कर पारायण, हंबीर तू खंबीर तू अशा एकापेक्षा एक गाणी लिहून प्रणितदादा गेला, कायमचा', अशा शब्दांत प्रवीण तरडेंनी भावना व्यक्त केल्या.