Happy Birthday Dev Anand : ऋषी कपूर यांनी शेअर केला 'तो' खास किस्सा

वृत्तसंस्था
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

आज देव आनंद वाढदिवसानिमित्त बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर यांनी सोशल मीडियावर त्यांच्याविषयी एक खास पोस्ट शएअर केली आहे.

मुंबई : एवरग्रीन अॅक्टर देव आनंद यांचा आज जन्मदिन आहे. आजचा त्यांचा 97 वा स्मृतीदिन आहे. बॉलिवूडचे सदाबहार अभिनेते आणि असं व्यक्तिमत्व जे आजही लोकांच्या मनात कायम आहे. आजही त्यांचे हजारो चाहते आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीत 1960 मध्ये राज कपूर, दिलीप कुमार, देव आनंद या दिग्गज कलाकारांच वर्चस्व कायम होतं. दिलीप कुमार तेव्हा गंभीर भूमिका करायचे तर, राज कुमार जॉली किंवा कॉमेडीच्या भूमिका साकारायचे. मात्र या सर्वांपासून हटके देव आनंद यांचा एक वेगळा अंदाज होता. त्यांची स्टाइल आणि रोमॅन्टिक शैलीचे आजही अनेक फॅन्स आहेत. 
देव आनंद यांनी कला क्षेत्रात दिलेल्या महत्तवपूर्ण योगदानासाठी त्यांना भारत सरकारकडून पद्मभूषणाने गौरवलं गेलं.

त्यांच्या सुपरहिट गाण्यांपैकी हे एक सदाबहार गाणं !

आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर यांनी सोशल मीडियावर त्यांच्याविषयी एक खास पोस्ट शएअर केली आहे. देव आनंद यांच्यासोबतची काही छायाचित्रे आणि एक खास किस्सा त्यांनी यावेळी शेअर केला. कॅप्शनमध्ये ऋषी कपून यांनी लिहिलं,' एवरग्रीन कलाकार देव आनंद साहेबांना त्यांच्या 97 व्या जन्मदिनी माझा सलाम. त्यांचासारखा स्टाइल आयकन आणि हृदयाने नेहमी तरुण राहणारा माणूस मी आजपर्यंत पाहिला नाही.'

पुढे त्यांनी लिहिलं,' माझा पहिला 1973 मधला चित्रपट 'बॉबी' प्रदर्शित झाल्यानंतर स्टारडस्ट मॅगझीनच्या पार्टीमध्ये ते मला भेटले होते. आपल्या सारख्या तरुणांनी एकत्र काम केलं पाहिजे असं ते मला त्यावेळी म्हणाले. त्यांचा आत्मविश्वास कमालीचा होता. '

देव आनंद यांनी जवळपास 6 दशके बॉलिवूडवर राज्य केलं आणि प्रेक्षकांच्या मनात घर केलं. त्यांचा पहिला चित्रपट 'हम एक है' हा 1946 मध्ये आला. त्यानंतर गाइड, टैक्सी ड्राइवर, ज्वेल थीफ, सीआईडी, काला बाजार, ज्वेल थीफ, जॉनी मेरा नाम, तेरे मेरे सपने, गैंबलर आणि  हरे रामा हरे कृष्णा असे अनेक सुपरहिट चित्रपट त्यांनी केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dev Anand birth anniversary Rishi Kapoor salutes the evergreen star with old pics