Dev Anand : काय होतं देव आनंदच्या चिरतारुण्याचं रहस्य?

हे वर्ष सदाबहार अभिनेता देव आनंद यांच्या जन्मशताब्दीचं वर्ष! त्यानिमित्तानं त्याच्याविषयीच्या आठवणींना दिलेला उजाळा...
Dev Anand Bollywood Legendary Actor Birth Centenary
Dev Anand Bollywood Legendary Actor Birth Centenary esakal

- सुभाषचंद्र जाधव

Dev Anand Bollywood Legendary Actor Birth Centenary : देव आनंद म्हणजे सळसळत्या उत्साहाचा अखंडपणे वाहणारा झराच! भूतकाळात देव आनंद कधी रमलाच नाही. त्याचा चित्रपट चालो अथवा न चालो, त्याची चित्रपटनिर्मिती तो हयात असेपर्यंत सतत चाललेलीच होती. कारण, ‘हर फिक्र को धूएमे उडाता चला गया’ हे त्याचं स्वतःचं जीवनसूत्रच त्यानं बनविलेलं होतं. ‘कंटाळा’ हा शब्द त्याच्या डिक्शनरीमध्येच नव्हता. या संदर्भात शशीकपूरने मला सांगितलेला हा किस्सा खूपच बोधप्रद आहे, असं म्हणता येईल.

देव आनंद ‘प्रेमपुजारी’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी महाबळेश्‍वरला तळ ठोकून होता, त्या वेळचा हा घडलेला किस्सा! त्याच वेळी शशीकपूरही त्याच्या एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी महाबळेश्‍वरलाच आलेला. कर्मधर्मसंयोगाने दोन्ही चित्रपटांच्या युनिट एकाच हॉटेलमध्ये उतरलेल्या होत्या.

शशीकपूर मला सांगत होता. देवसाहेब त्याच हॉटेलात उतरले आहेत, हे कळल्यानंतर मला केवढा आनंद झाला होता. मला वाटलं शूटिंग संपल्यानंतर संध्याकाळच्या सुमाराला मस्त गप्पा मारता येतील. झालं तर थोडीफार मौजमजाही करता येईल.

पण कसंच काय, नि कसंच काय! दिवसभर उन्हातान्हात शूटिंग करून हाडं खिळखिळी झालेला शशीकपूर रात्री पार थकून जाऊन खुर्चीत अंगाचं मुटकुळं करून असायचा. डोळ्यांवर पेंग आलेली असायची. शरीर आंबून गेलेलं असायचं अन्‌ अशा अवेळी देव आनंद अगदी उत्साहानं रसरसल्यासारखा त्याच्या स्टाइलमध्ये टणाटण उड्या मारत यायचा आणि शशीकपूरला फर्मावायचा ‘चल, मस्त फिरून येऊ.’

चरफडत शशीकपूर उठायचा आणि महाबळेश्‍वरच्या कुडकुडणाऱ्या थंडीत पाय ओढीत देव आनंदच्या मागे नाइलाजानं चालायला लागायचा. शशीकपूरची ही हालत देव आनंदच्या गावीही नसायची. तो लांब-लांब ढांगा टाकत चालत सुटायचा आणि त्याच्यामागून धावताना शशीला त्या तेवढ्या थंडीतही घाम फुटायचा.

त्यातून देवचं तोंड पायांइतक्याच वेगानं चालायचं. त्याचं बोलणं ऐकण्यासाठी आणि त्यावरचं आपलं बोलणं त्याला ऐकू जावं यासाठी देवच्या जवळपास असणं भाग होतं आणि देव आनंद तर असा बस पकडायला निघाल्यासारखा चाललेला. शशीकपूरचे हाल व्हायचे.

अशी ही धिंड थेट बोटक्लबपर्यंत निघायची. शशीकपूरच्या थोडा जिवात जीव यायचा. तिथल्या रेलिंगवर थोडा वेळा टेकायला मिळेल ही सुखद आशा त्याच्या मनात पालवायची; पण देव आनंद भोज्याला शिवल्यासारखा त्या रेलिंगला बुटानं स्पर्श करायचा अन्‌ त्याच पावली परत फिरायचा. रेलिंगकडं एक हपापलेला केविलवाणा दृष्टीक्षेप टाकून शशीकपूर असाह्यपणे देवच्या मागं धापा टाकत धावायचा. परतीचा प्रवास शशीकपूरच्या दृष्टीनं साहजिकच जास्त बिकट असे.

Dev Anand Bollywood Legendary Actor Birth Centenary
Rashmika Mandanna : नॅशनल क्रश रश्मिकानं केला आजारपणाचा मोठा खुलासा, 'त्या' दुखण्यानं केलं हैराण!

मुक्कामी परतल्यावर देव आनंद उत्साहानं म्हणायचा, ‘‘कसं फर्स्टक्लास वाटतं की नाही?’’ शशीकपूर खोल गेलेल्या आवाजात म्हणे, ‘‘हो तर.’’ आणि मग ‘‘चल तर आणखी एक चक्कर मारू या,’’ असं देव आनंदनं म्हटलं तर काय घ्या, असा विचार करून शशीकपूर घाईघाईनं ‘गुड नाइट’ म्हणून देव आनंदचा निरोप घेत असे. दुसऱ्या दिवशी हाच प्रकार, तिसऱ्या दिवशी हाच प्रकार. जोपर्यंत शशीकपूरचा मुक्काम त्या हॉटेलमध्ये होता, तोपर्यंत देव आनंदबरोबर त्याची ही वरात रोज रात्री निघत होती.

शशीकपूर मला सांगत होता, की त्यानंतर मी देवसाहेबांचा इतका धसका घेतला होता, की आउटडोअर शूटिंगला गेलो की सर्वप्रथम याचा शोध घ्यायचो, की आसपास कोठे देवसाहेब शूटिंगसाठी आलेले तर नाहीत ना!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com