तेलुगु अभिनेत्री श्रावणी आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना केली अटक, एक फरार

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Tuesday, 15 September 2020

देवराज श्रावणीला सतत त्रास देत असल्याने तिने आत्महत्या केल्याचं म्हटलं जात होतं. याप्रकरणात आता देवराज रेड्डी आणि साई कृष्णा रेड्डी यांना पोलिसांनी अटक केली आहे.  

मुंबई- तेलुगु अभिनेत्री श्रावणीने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केल्याने इंडस्ट्रीत खळबळ माजली होती. श्रावणीच्या आत्महत्येसाठी देवराज रेड्डी जबाबदार असल्याचं म्हटलं जातं होतं. देवराज तिला सतत त्रास देत असल्याने तिने आत्महत्या केल्याचं म्हटलं जात होतं. याप्रकरणात आता देवराज रेड्डी आणि साई कृष्णा रेड्डी यांना पोलिसांनी अटक केली आहे.  

हे ही वाचा: शूटींग दरम्यान मल्यायम अभिनेता प्रबीश यांचं निधन, सेटवर झाले बेशुद्ध    

तेलुगु अभिनेत्री श्रावणीच्या आत्महत्येतील आरोपी देवराज रेड्डी आणि साई कृष्णा रेड्डी यांना अटक केल्यानंतर मेडिकल टेस्टसाठी उस्मानिया हॉस्पिटलमध्ये पाठवलं गेलं आहे. पोलिसांना साई आणि देवराज यांचे श्रावणीला आत्महत्येसाठी प्रवृत्त करणारे ऑडीओ कॉल आणि व्हिडिओ मिळाले आहेत. या आत्महत्या प्रकरणातील तिसरा आरोपी 'आरएक्स १००' सिनेमाचा निर्माता अशोक रेड्डी फरार आहे.

सगळ्यात महत्वाचं म्हणजे देवराजला लग्नासाठी नकार दिल्याने आणि साईच्या सततच्या छळामुळे श्रावणीने आत्महत्या केली होती. नऊ सप्टेंबरला अभिनेत्री श्रावणीने आत्महत्या केल्याचं समोर आलं होतं. यानंतर तिचे चाहते आणि सहकारी दुःखात होते. श्रावणीच्या कुटुंबियांनी आरोप केला होता की देवराज रेड्डी छळ करत असल्याने श्रावणीने आत्महत्या केली. असं म्हटलं जातंय की देवराजने श्रावणीला त्रास दिल्याने श्रावणीने या जगाचा निरोप घेण्याचा निर्णय घेतला. 

श्रावणी गेल्या ८ वर्षांपासून तेलुगु कार्यक्रमांमध्ये काम करत होती. श्रावणीच्या हिट कार्यक्रमांमध्ये 'मौनरागम' आणि 'मनसु ममता' यांचा समावेश होता. श्रावणी सध्या 'मनसू ममता' मालिकेत कार्यरत होती. आंध्र प्रदेशची असणारी श्रावणी ८ वर्षांपूर्वी हैदराबादला आली होती. त्यानंतर तिने टीव्ही मालिकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती.    

devaraj reddy and sai krishna reddy arrested in the death case of actor sravani  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: devaraj reddy and sai krishna reddy arrested in the death case of actor sravani