esakal | शूटींग दरम्यान मल्याळम अभिनेता प्रबीश यांचं निधन, सेटवर झाले होते बेशुद्ध
sakal

बोलून बातमी शोधा

prabish

मल्यायम अभिनेता प्रबीश चक्कलवक्कल शूटींग दरम्यान बेशुद्ध होऊन पडले आणि त्यांचं निधन झालं. ते ४४ वर्षांचे होते.

शूटींग दरम्यान मल्याळम अभिनेता प्रबीश यांचं निधन, सेटवर झाले होते बेशुद्ध

sakal_logo
By
दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- मल्यायम अभिनेता प्रबीश चक्कलअक्कल शूटींग दरम्यान बेशुद्ध होऊन पडले आणि त्यांचं निधन झालं. ते ४४ वर्षांचे होते. प्रबीश केरळमधील कोच्चिमध्ये एका युट्युब चॅनेलसाठी शूटींग करत होते तेव्हा ते अचानक बेशुद्ध पडले.  

हे ही वाचा:  बापरे ! साऊथची 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री करते एकावेळी १०८ सूर्यनमस्कार, चाहत्यांमध्ये आहे तिच्या सौंदर्याची जबरदस्त क्रेझ  

प्रबीशच्या सहका-याने सांगितलं की प्रबीश यांनी सेटवर काम पूर्ण केलं आणि ग्रुप फोटो काढत होते तेव्हा ती जमीनीवर पडले. मिडिया रिपोर्ट्सनुसार, प्रबीश जेव्हा सेटवर पडले तेव्हा त्यांनी एका व्हिडिओग्राफरकडे पाणी मागितलं. त्यांनी लगेच पाणी दिलं. याचदरम्यान त्यांच्या खिशात कारची चावी मिळाली आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. हॉस्पिटलमध्ये नेल्यावर प्रबीश यांना मृत घोषित करण्यात आलं. 

प्रबीश यांनी अनेक टेलिफिल्म्स केल्या आहेत. डबिंग आर्टिस्ट म्हणून त्यांनी अनेक प्रसिद्ध मल्यायम सिनेमांसाठी काम केलं आहे. प्रबीश यांच्यामागे वडिल, पत्नी आणि मुलगी आहेत.   

malayalam actor prabeesh chakkalakkal collapses during shoot and dies