
'देवमाणूस २'चा महाआरंभ; किरण गायकवाडच्या नव्या लूकने वेधलं लक्ष
झी मराठी वाहिनीवरील 'देवमाणूस' Devmanus या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं आणि प्रेक्षकांना टीव्ही स्क्रीनला खिळवून ठेवलं. या मालिकेतील रंजक वळण पाहताना प्रेक्षक टीव्हीसमोरून हलत नसत. या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता किरण गायकवाड याच्या अभिनयाचं देखील प्रचंड कौतुक झालं. त्याच्या अभिनयाने त्याने तमाम प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आणि 'देवमाणूस'मधील भूमिकेने त्याने प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली. मालिकेचा जेव्हा शेवट झाला तेव्हा मालिकेचा दुसरा भाग येणार अशी चर्चा सुरु होती आणि प्रेक्षक आतुरतेने या दुसऱ्या भागाची वाट बघत होते. आता तो क्षण लवकरच येणार आहे. 'देवमाणूस' पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
मालिकेचा दुसऱ्या भागाचा टीझर प्रेक्षकांनी पाहिला आणि सोशल मिडियावर चर्चेला उधाण आलं. हा नवीन सिझन लवकरच सुरू होणार असून यातील कलाकारांची माहिती अजूनही गुलदस्त्यात आहे. तसंच देवमाणूसची मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता किरण गायकवाड याचा लूक या नवीन भागात कसा असणार आहे याची उत्सुकता देखील प्रेक्षकांना आहे. 'ती परत आलीये' ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्याजागी 'देवमाणूस २' मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज होणार आहे.
हेही वाचा: 'घटस्फोट झाला म्हणून महिलेनं जीव द्यावा का?'; ट्रोलरला काम्या पंजाबीचा सवाल
'देवमाणूस २'चा महाआरंभ, एक तासाचा विशेष भाग रविवारी १९ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर २० डिसेंबर पासून दर सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वाजता झी मराठी वाहिनीवर ही मालिका प्रसारित होणार आहे.
Web Title: Devmanus 2 Maha Episode Updates Kiran Gaikwads New Look Creates Buzz On Social Media
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..