देवमाणूस: अटकेनंतर अजितच्या डोक्यात नव्या खेळीची समीकरणं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Devmanus

देवमाणूस: अटकेनंतर अजितच्या डोक्यात नव्या खेळीची समीकरणं

एखादी व्यक्ती आपल्याला देवासमान वाटते, पण त्याचा खरा चेहरा मात्र वेगळाच असतो. चांगुलपणाचा बुरखा पांघरून घात करणाऱ्या अशा वृत्तीविषयी भाष्य करणारी मालिका म्हणजे देवमाणूस Devmanus. एक बोगस डॉक्टर जो गावातल्या भाबड्या लोकांना आपल्या बोलघेवड्या स्वभावाने भुरळ पाडतो. अल्पावधीतच गावात देवमाणूस म्हणून त्याची ख्याती पसरते. या देवमाणसाच्या बुरख्याआड लपला आहे एक असा चेहरा, ज्याची कोणी कल्पनाही केली न्वहती. या मालिकेत अभिनेता किरण गायकवाड Kiran Gaikwad डॉक्टर अजितकुमारची भूमिका साकारत आहे. (devmanus marathi serial upcoming episode updates)

भर लग्नमंडपातून अजितला अटक झाल्यानंतर, झालेली नाचक्की आणि अपमान तो सहन करू शकत नाहीये. या अटकेनंतर झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी अजितच्या डोक्यात नवी समिकरणं शिजू लागली आहेत. यासाठी तो डिंपलची मदत घेतोय. दुसरीकडे सगळं गाव त्याच्या मागे उभं आहे, कारण त्यांच्या लेखी तो देवमाणूस आहे. पण एसीपी दिव्यासुद्धा तिच्या निर्णयावर ठाम आहे. अजितविरुद्धचे सर्व पुरावे तिने गोळा केले आहेत. कोर्टासमोर सर्व पुरावे सादर करेन आणि जगासमोर त्याचा खरा चेहरा आणेन असं ती सांगते.

हेही वाचा: 'देवमाणूस'चा शेवट इतक्यात नाही; येणार मोठा ट्विस्ट

हेही वाचा: शेवटपर्यंत उत्सुकता ताणून ठेवणारे 'हे' ८ चित्रपट पाहिलेत का?

पोलीस स्थानकातून बाहेर पडताना संपूर्ण गाव बाहेर जमला आहे. अजित त्याची केस स्वत:च लढणार असं ठरवतो. दिव्या आणि सरकारी वकील यांना अजितच्या चतुराईची कल्पना येते. डिंपलच्या घरातील सर्वजण अजूनही अजितच्या बाजूने आहेत. समोर येणारे पुरावे पाहून ते देखील संभ्रमात आहेत. आता या मालिकेत पुढे काय होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

Web Title: Devmanus Marathi Serial Upcoming Episode

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top