'देवमाणूस' मालिकेत मोठा ट्विस्ट; देवीसिंगचा जुळा भाऊ डॉ. अजितकुमार देव? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

devmanus

'देवमाणूस' मालिकेत मोठा ट्विस्ट; देवीसिंगचा जुळा भाऊ डॉ. अजितकुमार देव?

झी मराठी वाहिनीवरील 'देवमाणूस' Devmanus ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरली. या मालिकेचं कथानक सध्या अत्यंत उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. गावकऱ्यांसाठी देवमाणूस ठरलेल्या डॉ. अजितकुमार देव ऊर्फ देवीसिंग याला अटक केली असून त्याच्यावरील खटला सुरू आहे. तुरुंगात असूनही त्याचे विविध कारनामे सुरू आहेत. आता यात आणखी एक मोठा ट्विस्ट येणार आहे. मालिकेच्या नवीन प्रोमोने कथानकाची उत्सुकता आणखी वाढवली आहे. (devmanus new promo hinted big twist in the story of dr ajitkumar deo)

या नवीन प्रोमोमध्ये देवीसिंग आणि डॉ. अजितकुमार देव असे दोन वेगवेगळे व्यक्ती पाहायला मिळत आहेत. देवीसिंग हा डॉ. अजितकुमारचाच जुळा भाऊ असल्याचं म्हटलं जातंय. या दोघांमध्ये झालेल्या संभाषणादरम्यान डॉ. अजितकुमार हा त्याच्या आईवडिलांच्या मृत्यूचा दोष देवीसिंगला देताना दिसतो. तर दुसरीकडे डॉ. अजितकुमार देव हा आपला जुळा भाऊ असल्याचं देवीसिंग डिंपलला सांगतो. त्यामुळे हे नेमकं प्रकरण काय आहे, याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

हेही वाचा: सोनाली कुलकर्णीची आफ्रिका 'सफारी'

हेही वाचा: अचानक बंद करण्यात आल्या 'या' मराठी मालिका

या मालिकेत सध्या नव्या पोलीस अधिकाऱ्याची एंट्री झाली आहे. त्यामुळे दिव्या सिंगची भूमिका साकारणारी अभिनेत्री नेहा खान या मालिकेचा निरोप घेणार असल्याची चर्चा आहे. महेश मांजरेकर सूत्रसंचालन करत असलेला 'बिग बॉस मराठी' या वादग्रस्त आणि सर्वांत लोकप्रिय रिअॅलिटी शोचा तिसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या तिसऱ्या सिझनमध्ये सहभागी होण्यासाठी नेहा खान 'देवमाणूस' मालिका सोडत असल्याची चर्चा आहे.

Web Title: Devmanus New Promo Hinted Big Twist In The Story Of Dr Ajitkumar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top