'तारक मेहता..'मधील 'गडा इलेक्ट्रॉनिक्स' झालं पर्यटनस्थळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 taarak mehta ka ooltah chashmah, gada electronics

'तारक मेहता..'मधील 'गडा इलेक्ट्रॉनिक्स' झालं पर्यटनस्थळ

प्रसिद्ध मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' Taarak Mehta Ka Ooltah Chashmah गेली 12 वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. या मालिकेतील सर्व व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. 2008 साली या मालिकेचा पहिला एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या मालिकेमध्ये जेठालाल Jethalal या व्यक्तिरेखेचे गडा इलेक्ट्रॉनिक्स नावाचे दुकान दाखवले आहे. या दुकानात नट्टू काका आणि बागा हे दोन व्यक्ती जेठालालसोबत काम करतात. पण तुम्हाला माहितीये का, 'गडा इलेक्ट्रॉनिक्स' हे दुकानाचं सेट नसून चक्क खरे दुकान आहे. (taarak mehta ka ooltah chashmah jethalal gada electronics becomes tourist spot)

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील गडा इलेक्ट्रॉनिक्स दुकान मुंबईमधील खार येथे आहे. या दुकानाचे खरे नाव शेखर इलेक्ट्रॉनिक्स असे आहे. दुकानाचे मालक शेखर गडियार हे गेली कित्येक वर्षे या मालिकेच्या शूटिंगसाठी दुकान भाड्याने देत आहेत. सुरुवातीच्या काळात शेखर यांना शूटिंगमुळे दुकानाचे नुकसान तर होणार नाही ना? अशी काळजी वाटत होती. पण आजपर्यंत या दुकानाचे शूटिंगदरम्यान कोणतेही नुकसान झालेले नाही, असं ते म्हणतात. हे दुकान आता पर्यटनस्थळ झाले आहे. मालिकेमुळे प्रसिद्ध झालेल्या या दुकानाला अनेक पर्यटक भेट देतात आणि आठवण म्हणून दुकानासमोर फोटो देखील काढतात.

हेही वाचा: संजय दत्तला मिळाला UAE चा गोल्डन व्हिसा

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेमधील जेठालाल, दया, पोपटलाल, भिडे, माधवी, अय्यर, बबिता, कोमल या व्याक्तिरेखांना प्रेक्षकांची विषेश पसंती मिळते. गोकूळधाममध्ये राहणाऱ्या या रहिवाश्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या गमती-जमती प्रेक्षकांच्या पहायला आवडतात. गोकूळधाममधील सर्व सदस्य प्रेक्षकांना आपलेसे वाटतात.

हेही वाचा: आई- सावत्र वडिलांची भांडणं, पलकचा मोठा निर्णय?