दिव्या भटनागरच्या निधनानंतर देवोलिनाला अश्रु अनावर, दिव्याच्या पतीला दिली धमकी

दिपाली राणे-म्हात्रे
Tuesday, 8 December 2020

अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जीला अश्रू अनावर झाले आहेत. तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तिने दिव्याचा पती गगन गबरुबाबत धक्कादायक खुलासे केले आहेत. 

मुंबई- छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री दिव्या भटनागरनच्या निधनाने टीव्ही इंडस्ट्रीला मोठा धक्का बासला आहे. कोरोनाबाधित झाल्यानंतर दिव्याची तब्येत खूप खालावली होती. उपचारादरम्यान तिने हॉस्पिटलमध्येच अखेरचा श्वास घेतला. दिव्याच्या निधनाच्या बातमीने टीव्ही इंडस्ट्रीतील अनेकांना मोठा धक्का बसला आहे. कित्येक सेलिब्रिटी तिच्या निधनावर सोशल मिडियाच्या माध्यमातून दुःख व्यक्त करत आहेत. यादरम्यान टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जीला अश्रू अनावर झाले आहेत. तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तिने दिव्याचा पती गगन गबरुबाबत धक्कादायक खुलासे केले आहेत. 

हे ही वाचा: दिशाला सुन बनवण्यासाठी राहुल वैद्यची आई उत्सुक, लग्नाबाबत म्हणाल्या..  

अभिनेत्री देवोलिनाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती अत्यंत धुसमुसुन रडताना दिसतेय. तिने या व्हिडिओमध्ये सांगितलं की दिव्या भटनागर तिची किती चांगली मैत्रीण होती आणि किती उत्तम व्यक्ती होती. देवोलिनाने याचा खुलासा केला की कशा प्रकारे दिव्याला तिच्या रिलेशनशिपमध्ये धोका मिळाला. तिने या व्हिडिओमध्ये दिव्याचा पती गगन गबरुवर अनेक आरोप करत धक्कादायक खुलासे केले आहेत. तिने म्हटलंय की 'गगन दिव्याच्या नावाचा उपयोग करुन प्रसिद्धी मिळवत होता.' तसंच देवोलिनाने त्याला कायदेशीर कारवाई करणार असल्याची देखील धमकी दिली आहे.

या व्हिडिओमध्ये देवोलिनाने गगन गबरुवर दिव्याला मारपीट करत असल्याचा आणि तिला मानसिक तणाव देत असल्याचा आरोप केला आहे. इतकंच नाही तर गगन गबरु शोषण केल्याप्रकरणी ६ महिन्यांची शिक्षा देखील भोगली आहे आणि तो दिव्याच्या जोरावरंच मुंबईत असल्याचं तिने म्हटलं आहे. यासोबतंच देवोलिनाने गगन गबरुचे 'काळे धंदे' उघडकीस आणण्याची धमकी देत 'आता तर तु जेलमध्येच सडणार' असा राग व्यक्त केला आहे.     

devoleena bhattacharjee cried after divya bhatnagar demise expose her husband gagan gabru  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: devoleena bhattacharjee cried after divya bhatnagar demise expose her husband gagan gabru