
राहुल वैद्यने गर्लफ्रेंड दिशा परमारला लग्नासाठी मागणी घातली. त्यानंतर आत्तापर्यंत दिशाचं कोणतंही उत्तर समोर आलेलं नाही. मात्र असं असलं तरी राहुल वैद्य आणि दिशा परमार यांच्या नात्याला राहुलच्या आईची मात्र मंजुरी मिळाली आहे.
मुंबई- 'बिग बॉस १४'च्या या विकेंडच्या वारमध्ये सलमान खानने राहुल वैद्यला घराबाहेरचा रस्ता दाखवला. राहुलशी सलमान खूप नाराज होता आणि त्याला हे सांगत घरातून बाहेर जाण्यासाठी सांगितलं की त्याच्यामध्ये गेमच्या बाबतीत जराही सिरियसनेस नाहीये. शोमध्ये राहुल वैद्यने गर्लफ्रेंड दिशा परमारला लग्नासाठी मागणी घातली. त्यानंतर आत्तापर्यंत दिशाचं कोणतंही उत्तर समोर आलेलं नाही. मात्र असं असलं तरी राहुल वैद्य आणि दिशा परमार यांच्या नात्याला राहुलच्या आईची मात्र मंजुरी मिळाली आहे.
हे ही वाचा: अनुराग कश्यप आणि अनिल कपूर यांच्यात 'या' कारणामुळे सुरु आहे ट्विटर वॉर
गायक राहुल वैद्यची आई गीता वैद्यने राहुल आणि दिशा यांच्या नात्यावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलंय की 'राहुल बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर दोघांच्या लग्नाची प्लानिंग सुरु करणार आहे.' राहुल वैद्यने ११ नोव्हेंबरला दिशा परमारच्या वाढदिवशी तिला लग्नासाठी विचारणा केली होती. त्याने त्याच्या सफेद टी शर्टवर लिपस्टिकने एका बाजुला 'हॅप्पी बर्थ डे' असं लिहून दिशाला शुभेच्छा दिल्या होत्या.
इतकंच नाही तर त्याच टी शर्टवर त्याने एकीकडे 'माझ्याशी लग्न करशील?' असं लिहून दिशाला प्रपोज केलं होतं. हे सगळं त्याने 'बिग बॉस'च्या शोमध्ये असताना केलं. दिशाला लग्नासाठी प्रपोज केल्यानंतर राहुल तिच्या उत्तराची आतुरतेने वाट पाहत आहे. तर नुकताच दिशाने ट्विटरवर खुलासा केला होता की तिने तिचं उत्तर राहुलला पाठवलं आहे. मात्र तिने हा खुलासा केला नाही की यात तिने नेमकं काय उत्तर दिलं आहे.
rahul vaidya mother geeta vaidya confirms her son wedding to disha parmar