ऐकलं का? माधुरी येतेय; ओटीटी प्लॅटफॉर्ममधून इंट्री  

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 3 March 2021

माधुरी दीक्षितनेदेखील ट्विट करत चाहत्यांसोबत तिच्या डिजिटल डेब्यूची बातमी शेअर केली आहे.  

मुंबई - अभिनय आणि नृत्य यामुळे भारतीय प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारी माधुरी बॉलीवूडची क्वीन आहे. तिच्या अभिनयाचा प्रभाव अद्याप भारतीय प्रेक्षकांवर आहे. गेल्या काही काळापासून तिनं बॉलीवूडपासून फारकत घेतली होती. मात्र आता ती पुन्हा कमबॅक करण्यासाठी तयार झाली आहे. एका ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोशल मीडियावर जेव्हा ही माहिती व्हायल झाली तेव्हापासून तिच्यावर कौतूकाचा वर्षाव होताना दिसत आहे.

माधुरी दीक्षितनेदेखील ट्विट करत चाहत्यांसोबत तिच्या डिजिटल डेब्यूची बातमी शेअर केली आहे.  तुम्हाला कदाचित आठवत असेल तर कलंक सिनेमानंतर माधुरी दीक्षित काही डान्स शोमधून जजच्या भूमिकेत दिसली होती.  त्यानंतर ती आता मोठा ब्रेक घेऊन पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये देखील उत्सुकता निर्माण झाली आहे.

नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी येणाऱ्या अनेक सिनेमांची घोषणा करण्यात आली आहे. यात अरण्यकच्या माध्यमातून रविना टंडन वेबविश्वात पदार्पण करत आहे. तर कार्तिक आर्यनची प्रमुख भूमिका असलेला ‘धमाका’ हा चित्रपटही लवकरच प्रदर्शित होईल. प्रख्यात दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरच्या एका वेब सीरिजमधून ती दिसणार आहे. आपल्या अभिनय आणि डान्समुळे ती सर्वांच्या पसंतीची अभिनेत्री म्हणून प्रसिध्द झालेली अभिनेत्री आहे.

त्याचे काय आहे की,  नेटफ्लिक्स इंडियाने आपल्या या वर्षात प्रदर्शित होणाऱ्या सिनेमाची आणि वेबसीरीजची नावं नुकतीच प्रसिद्ध केली आहेत. त्यात वेगवेगळ्या भाषांमधील चित्रपट आणि वेब सीरीजची प्रेक्षकांना मेजवानी मिळणार आहे. तर अनेक मोठे  कलाकार वेगवेगळ्या प्रकारच्या चित्रपट आणि मालिकांतून ओटीटी प्लॅटफॉर्मवर येण्याचा विचार करत आहेत. 

'जावेद चाचा थँक्यु'; कंगणाचा टोमणा |

‘फाइडिंग अनामिका’ या वेब शो मधून माधुरी चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या शोमध्ये तिच्यासोबत संजय कपूर, मानव कौल हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. करण जोहरच्या डिजीटल प्रोडक्शन हाउसचे 5 बिग बजेट प्रोजेक्ट नेटफ्लिक्सवर पाहायला मिळणार आहेत. यात एव्हरग्रीन माधुरीच्या डिजिटल डेब्यूचा ही समावेश आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dhak dhak actress Madhuri dixit announce her digital debut on Netflix