esakal | वहिनीसाहेबांनी पहिल्यांदाच पोस्ट केला बाळाचा फोटो

बोलून बातमी शोधा

dhanashri kadgaonkar }

अभिनेत्री धनश्री कडगावकरने मुलाला जन्म दिला.

वहिनीसाहेबांनी पहिल्यांदाच पोस्ट केला बाळाचा फोटो
sakal_logo
By
स्वाती वेमूल

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत नंदिनी वहिनीसाहेबांची भूमिका साकारुन घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री धनश्री कडगावकरने मुलाला जन्म दिला. जानेवारी महिन्यात धनश्रीने चाहत्यांना ही गोड बातमी सांगितली. त्यानंतर आता पहिल्यांदाच तिने बाळासोबतचा फोटो पोस्ट केला आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर धनश्रीने हा फोटो पोस्ट केला असून त्यावर चाहत्यांकडून लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होतोय. 

घरात चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होताच संपूर्ण कुटुंब त्याची काळजी घेण्यात व्यग्र असल्याचं धनश्रीने आधीच्या पोस्टमध्ये सांगितलं होतं. यात तिने तिचा बाळंतपणानंतरचा अनुभवसुद्धा सांगितला. आयुष्यात त्या चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होताच आईवडिलांचा प्राधान्यक्रम पूर्णपणे बदलतो आणि दिवसरात्र त्याची काळजी घेण्यात दोघंही गुंतून जातात. 

हेही वाचा : 'देव तुमच्यावर ही वेळ आणू नये'; लग्नाबद्दल विचारणाऱ्यांना अभिज्ञा भावेचं उत्तर 

'झोपेचं काय करायचं यार', असंही तिने एका इन्स्टा स्टोरीमध्ये लिहिलं होतं. याबद्दल टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, "मी आयुष्यात कधीच इतकी बिझी झाले नव्हते. आईचं काम दिवसातील २४ तास सुरुच असतं. प्रत्येक पाच मिनिटांनी काहीतरी होतंय आणि आम्ही सर्वजण त्या चिमुकल्याची काळजी घेण्यासाठी धावपळ करतोय. पती दुर्वेशसुद्धा घरातूनच काम करत असल्याने तोसुद्धा बाळाकडे लक्ष देत असतो." धनश्रीने दुर्वेश देशमुखशी लग्न केलं. काही दिवसांपूर्वीच तिने दुर्वेशचा बाळासोबतचा फोटो पोस्ट केला होता, ज्यामध्ये त्याने एकीकडे त्याला कडेवर घेतलंय आणि दुसरीकडे लॅपटॉपवर काम करताना दिसतोय. 'बाबा.. दुहेरी जबाबदारी पेलताना', असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं होतं.