खांद्यापर्यंत वाढलेले केस अन् छातीपर्यंत आलेली दाढी..धनुषला पाहून लोक म्हणू लागले,'अरे हा तर..' Dhanush Video Viral | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhanush  New Look Viral

Dhanush Video Viral: खांद्यापर्यंत वाढलेले केस अन् छातीपर्यंत आलेली दाढी..धनुषला पाहून लोक म्हणू लागले,'अरे हा तर..'

Dhanush Video Viral: साऊथ सिनेमाचा सुपरस्टार धनुषनं बॉलीवूडमध्येही काही सिनेमे केले आहेत. हिंदी प्रेक्षक देखील त्याच्या अभिनयाचे दिवाने आहेत. गेल्या काही दिवसांपासून धनुष त्याच्या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे.

सोमवारी २९ मे रोजी त्याला एअरपोर्टवर स्पॉट केलं गेलं होतं. यादरम्यान धनुषचा व्हिडीओ समोर आला आहे,ज्यामध्ये त्याला ओळखणं कठीण झालं आहे.(Dhanush New Beard Look, long hair Video Viral)

सोमवारी सकाळी २९ मे रोजी धनुष मुंबई एअरपोर्टवर गुलाबी रंगाच्या स्वेट शर्टमध्ये आणि ट्रॅक पॅंट घालून स्पॉट केला गेला.

यादरम्यान अभिनेत्यानं आपल्या नवीन लूकनं हैराण करून सोडलं आहे. धुनषची छातीपर्यंत वाढलेली दाढी आणि खांद्यापर्यंत वाढलेले केस पाहून पापाराझीनं देखील त्याला त्याच्या लूक विषयी अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडलं.

सोशल मीडियावर एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे- मला वाटलं बाबा रामदेव पॅंट शर्ट घालून आलेयत. तर आणखी एकानं लिहिलं आहे-'मला वाटलं हा बाबा रामदेवच्या बायोपिकमध्ये काम करतोय की काय?' तिसऱ्या एका नेटकऱ्यानं चक्क लिहिलं आहे की-'तुम्ही बाबा रामदेव आहात का?'

काही दिवसांपूर्वी धनुषनं आपल्या लूकची झलक सोशल मीडियावर शेअर केली होती. सोबत त्यानं लिहिलं होतं,'वाथी प्रमोशन स्टाइल,माझी आवडती हेअर स्टाइल'. फेब्रुवारी महिन्यात अभिनेत्याचा 'वाथी' सिनेमा रिलीज झाला होता.

धनुषच्या वर्कफ्रंटविषयी बोलायचं झालं तर अभिनेता 'वाथी' सिनेमात दिसला होता. त्याचं दिग्दर्शन वेंकी अटलुरीनं केलं होतं. या सिनेमात त्याच्यासोबत संयुक्ता मेनन देखील दिसली होती. यावर्षी धनुष 'SIR' सिनेमात दिसणार आहे. यामध्ये तो समंथा सोबत दिसणार आहे.