धनुष ठरला खरा 'राउडी', त्याच्या 'या' गाण्याने पार केला १ अब्ज व्ह्युजचा टप्पा

दिपाली राणे-म्हात्रे
Tuesday, 17 November 2020

धनुषने त्याच्या अनोख्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. मात्र सध्या धनुष त्याच्या एका गाण्यामुळे प्रचंड चर्चेत आला आहे.

मुंबई-   साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांचा जावई आणि अभिनेता धनुष हा दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक सुपरस्टार अभिनेता आहे. धनुषने त्याच्या अनोख्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. मात्र सध्या धनुष त्याच्या एका गाण्यामुळे प्रचंड चर्चेत आला आहे. ते गाणं म्हणजे ‘राउडी बेबी’. या गाण्यात तो अभिनेत्री साई पल्लवीसोबत डान्स करतोय. खासियत म्हणजे धनुष आणि साई पल्लवीच्या या गाण्याला युट्यूबवर तब्बल १०० कोटी व्ह्यूज मिळाले आहेत.

हे ही वाचा: 'माझ्या मुलाने भारतात गायक होऊ नये', सोनु निगमच्या वक्तव्यामुळे नवीन वादाला कारण?    

अभिनेता धनुषने सोशल मिडियावर एक पोस्ट लिहून चाहत्यांना एक खास गोष्ट सांगितली आहे. त्याने लिहिलंय, ''काय अजब योगायोग आहे. 'राउडी बेबी' या गाण्याला १०० कोटी व्ह्यूज मिळाले आहेत आणि याच दिवशी ९ वर्षांपूर्वी माझ्या 'वाय धिस कोलावरी डी' या गाण्याला चाहत्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. हे पहिलं दाक्षिणात्य गाणं आहे ज्याला युट्यूबवर १०० कोटी व्ह्यूज मिळाले आहेत. यासाठी मी सर्व चाहत्यांचे मनापासून आभार मानतो.'' असं ट्विट करुन धनुषने सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होतंय.

'राउडी बेबी' हे गाणं 'मारी २' या सिनेमातील आहे. युवन शंकर राजा याने या गाण्याला म्यूझिक दिलं आहे. या गाण्याचे बोल स्वत: धनुषने लिहिले आहेत. या गाण्यात धनुष आणि साई पल्लवीची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळतेय. धनुषसोबतंच साईने देखील ट्विट करुन चाहत्यांचे आभार मानले आहेत.

dhanush rowdy baby song set a record on the 9th year of kolaveri di 1 billion views 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dhanush rowdy baby song set a record on the 9th year of kolaveri di 1 billion views