''माझ्या मुलाने भारतात गायक होऊ नये'', सोनु निगमच्या वक्तव्यामुळे नवीन वादाला कारण?

दिपाली राणे-म्हात्रे
Tuesday, 17 November 2020

काही वर्षांपूर्वी सोनू निगमचा मुलगा नीवन निगमचा एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओमध्ये तो हिट गाणं 'कोलावरी डी' गात होता. 

मुंबई- प्रसिद्ध गायक सोनु निगमने नुकतंच 'ईश्वर का वो सच्चा बंदा' हे गाणं रिलीज केलं आहे. या गाण्याच्या प्रमोशन दरम्यान सोनु निगम असं काही म्हणाला आहे की ते ऐकून लोक हैराण झाले आहेत. सोनु निगमने टाईम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की त्याला वाटतं की त्याच्या मुलाने गायक बनु नये.

हे ही वाचा: कॅन्सरग्रस्त तमिळ अभिनेत्याची अशी झालीये अवस्था.. उपचारांसाठी पैसै नसल्याने केलं मदतीचं आवाहन  

सोनु निगम अनेकदा त्याच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतो. असंच एक मोठं विधान त्याने नुकतंच केलं आहे. पुन्हा एकदा सोनु निगमने त्याच्या वक्तव्यामुळे लोकांना आश्चर्यचकित केलं आहे. त्याचं म्हणणं आहे की त्याला त्याच्या मुलाने गायक होऊ नये असं वाटतंय. केवळ एवढंच बोलून तो थांबला नाही तर त्याचं म्हणणं आहे जरी गायक बनला तरी किमान भारतात तरी बनु नये.    

सोनू निगमला एका मुलाखतीत विचारलं गेलं की तुझ्या मुलाला देखील गायक व्हायचं आहे का? यावर उत्तर देताना सोनूने म्हटलं की, ''खरं सांगायचं तर मला नाही वाटत की त्याने गायक बनावं. किमान या देशात तरी बनू नये. त्याने पुढे सांगितलं की, तसाही तो आता भारतात राहत नाही. तो दुबईत राहतो. त्याला आधीच भारताबाहेर पाठवलं आहे.'' त्याच्या या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटणार की काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे. 

सोनुने सांगितलं की  ''सध्या माझा मुलगा दुबईमध्ये टॉप गेमर आहे. एक गेम फोर्टनाईट आहे आणि तिथे तो त्याचा टॉप गेमर आहे. तो अतिशय हुशार मुलगा आहे ज्याच्यामध्ये अनेक गुण आहेत. मी त्याला कुठेही वळवू इच्छित नाही. बघुया की तो स्वतः काय निवडतोय?''  काही वर्षांपूर्वी सोनू निगमचा मुलगा नीवन निगमचा एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओमध्ये तो हिट गाणं 'कोलावरी डी' गात होता. 

sonu nigam son neevan not to be singer not in india at least new song  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sonu nigam son neevan not to be singer not in india at least new song