MFK 2022: 'धर्मवीर' ठरला महाराष्ट्राचा फेवरेट सिनेमा तर Riteish Deshmukh ला मिळाला हा खास पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MFK 2022, Riteish Deshmukh

MFK 2022: 'धर्मवीर' ठरला महाराष्ट्राचा फेवरेट सिनेमा तर Riteish Deshmukh ला मिळाला हा खास पुरस्कार

MFK Awards 2022: झी टॉकीजच्या महाराष्ट्राचा फेवरेट कोण २०२२ पुरस्कार सोहळा नुकताच संपन्न झाला. या पुरस्कार सोहळयात अनेक मराठी सेलिब्रिटी उपस्थित होते.

२०२२ ला प्रदर्शित झालेल्या अनेक सिनेमांचा आणि कलाकारांचा या पुरस्कार सोहळ्यात सन्मान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यात धर्मवीर सिनेमाने सर्वाधिक पुरस्कार जिंकले. सोहळ्याचं मुख्य आकर्षण होतं ते म्हणजे रितेश देशमुखची उपस्थिती.

(Dharamveer wins Maharashtra's favorite film, Riteish Deshmukh gets special award MFK 2022)

या सोहळ्यात महाराष्ट्राचा फेव्हरेट सिनेमा ठरलाय धर्मवीर. याशिवाय धर्मवीर सिनेमातील आनंद दिघेंच्या भूमिकेसाठी प्रसाद ओकला महाराष्ट्राचा फेवरेट अभिनेता म्हणून गौरवण्यात आले.

याशिवाय चंद्रमुखी सिनेमासाठी अमृता खानविलकरला महाराष्ट्राची फेवरेट अभिनेत्री म्हणून सन्मानित करण्यात आले. वेड (Ved) सिनेमासाठी अभिनेता रितेश देशमुखला 'महाराष्ट्राचा फेवरेट स्टाईल आयकॉन' पुरस्कार मिळाला. महेश कोठारे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.

महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण २०२२ मध्ये कोणाकोणाला कोणते पुरस्कार मिळाले बघा

महाराष्ट्राचा फेवरेट दिग्दर्शक प्रवीण तरडे - धर्मवीर

महाराष्ट्राचा फेवरेट अभिनेता प्रसाद ओक - धर्मवीर

महाराष्ट्राचा फेवरेट अभिनेत्री अमृता खानविलकर - चंद्रमुखी

महाराष्ट्राचा फेवरेट सुवर्णवती सई ताम्हणकर

महाराष्ट्राचा फेवरेट स्टाईल आयकॉन - रितेश देशमुख

महाराष्ट्राचा फेवरेट पॉप्युलर फेस ऑफ द इयार - ऋता दूर्गुळे

महाराष्ट्राचा फेवरेट सहाय्यक अभिनेत्री स्नेहल तरडे - धर्मवीर

महाराष्ट्राचा फेवरेट खलनायिका - प्राजक्ता माळी - पांडू

महाराष्ट्राचा फेवरेट सहाय्यक अभिनेता सिद्धार्थ जाधव - दे धक्का 2

महाराष्ट्राचा फेवरेट ट्रेंड सेंटर - रितेश देशमुख

महाराष्ट्राचा फेवरेट गायिका - श्रेया घोषाल - चंद्रमुखी

महाराष्ट्राचा फेवरेट गायक - आदर्श शिंदे - अष्टमी (धर्मवीर)

महाराष्ट्राचा फेवरेट गीत - चंद्रा (चंद्रमुखी)

कलाकारांच्या उपस्थितीत महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण २०२२ पुरस्कार संपन्न झाला. धर्मवीर सिनेमाने सर्वाधिक पुरस्कार पटकावले.

याशिवाय चंद्रमुखी सिनेमाची सुद्धा पुरस्कार सोहळ्यात हवा होती. या पुरस्कार सोहळ्यात केदार शिंदेंच्या महाराष्ट्र शाहीर सिनेमातील खास गाण्याची झलक दाखवण्यात आली. अंकुश चौधरी आणि सना शिंदे यांनी खास डान्स केला