esakal | जेव्हा धर्मेंद्र आणि हेमा मालिनी ओक्साबोक्सी रडले होते, व्हिडिओ व्हायरल

बोलून बातमी शोधा

dharmendra

अभिनेत्री ईशा देओलनेही एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये धर्मेंद्र आणि हेमा मालिनी ओक्साबोक्सी रडताना दिसत आहेत.

जेव्हा धर्मेंद्र आणि हेमा मालिनी ओक्साबोक्सी रडले होते, व्हिडिओ व्हायरल
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई- लॉकडाऊनमध्ये अनेकजण जुने फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आठवणींमध्ये रमत आहेत. याचदरम्यान अभिनेत्री ईशा देओलनेही एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये धर्मेंद्र आणि हेमा मालिनी ओक्साबोक्सी रडताना दिसत आहेत. सोशल मिडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. 

हे ही वाचा: पोलिसांनी ८ तासांनंतर सोडली अभिनेता रणवीर शौरीची गाडी, म्हणाले गरोदर महिलेची प्रसुती इमर्जन्सी नाही..

अभिनेत्री ईशा देओलने सोशल मिडियावर तिच्या विदाईचा व्हिडिओ शेअर केला आहे. मुलीची पाठवणी असताना कशी हालत होते हे या व्हिडिओमध्ये धर्मेंद्र आणि हेमा मालिनीकडे पाहून लक्षात येतंय. ईशाने जो व्हिडिओ शेअर केला आहे तो खूप भावूक क्षण आहे. ईशा स्वतः रडताना दिसतेय आणि हेमा मालिनी-धर्मेंद्र यांचा भावूक चेहराही सगळ्यांना इमोशनल करतोय.

मुलीची पाठवणी जेव्हा होतो तेव्हा आई-वडिलांच्या डोळ्यात एवढ्या वर्षाच्या आठवणी अश्रु होऊन वाहतात. ईशाचे काठोकाठ भरलेले डोळे, वडिल धर्मेंद्र यांना मिठी मारुन रडणं, आई हेमा यांच्या गळ्यात पडून रडणं हा तो क्षण आहे जेव्हा ईशा देओल लग्न करुन सासरी जात होती. हे क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात जे आठवून आपल्याला हमखास रडू कोसळतं..लग्नात सगळ्यात भावूक करणारा क्षण म्हणजे विदाई असते.

भावूक करणारा हा व्हिडिओ ईशा देओलने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. हा व्हिडिओ दीड मिनिटांचा असून ईशा देओल यात तिच्या भावना व्यक्त करत आहे. हा व्हिडिओ ती जेव्हा केव्हा पाहते तिच्या डोळ्यात पाणी येत असल्याचं तिने यात सांगितलं आहे. विशेष म्हणजे वडिल मुलीचं बॉॉन्डिंग यात दिसून येत आहे. धर्मेंद्रचं हे असं रडणं पाहून त्याचे चाहते देखील इमोशनल झाले आहेत.    

dharmendra and hema malini had tears in their eyes daughter esha deol shares a video