ढिंच्याक पुजाचे 'नाच के पागल' व्हायरल, नेटकऱ्यांनी लावला डोक्याला हात (व्हिडिओ)

वृत्तसंस्था
सोमवार, 29 जुलै 2019

गाण्यांची परंपरा मोडून काढण्याऱ्या ढिंच्याक पूजा पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांच्या भेटीला आली आहे नवीन गाणं घेऊन. ‘सेल्फी मैने लेनी आज’, ‘दिलो का स्कूटर’ आणि ‘आफ्रीन फातिमा बेवफा है’ या तीन ‘वेड’ लावणाऱ्या गाण्यांच्या यशानंतर ढिंच्याक पूजाने नुकतेच आपले नवीन गाणं प्रदर्शित केले आहे. ‘नाच के पागल’ असे या गाण्याचे नाव असून नेटकऱ्यांना या गाण्याने खरोखरच पागल केले आहे.

मुंबई : आपल्या हटके अंदाजामुळे कायम चर्चेत राहणाऱ्या ढिंच्याक पुजाचे नवे गाणे व्हायरल झाले असून, या गाण्यावरून तिला सोशल मीडियात ट्रोल करण्यात आले आहे.

गाण्यांची परंपरा मोडून काढण्याऱ्या ढिंच्याक पूजा पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांच्या भेटीला आली आहे नवीन गाणं घेऊन. ‘सेल्फी मैने लेनी आज’, ‘दिलो का स्कूटर’ आणि ‘आफ्रीन फातिमा बेवफा है’ या तीन ‘वेड’ लावणाऱ्या गाण्यांच्या यशानंतर ढिंच्याक पूजाने नुकतेच आपले नवीन गाणं प्रदर्शित केले आहे. ‘नाच के पागल’ असे या गाण्याचे नाव असून नेटकऱ्यांना या गाण्याने खरोखरच पागल केले आहे.

भयंकर व्हिडिओ त्याहून वाईट निर्मिती आणि त्याहून (अ)श्रवणीय आवाज असणारे हे ढिंच्याक पूजाचे हे गाणे सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. आधीच पूजाचा आवाज अगदीच श्रवणीय आहे त्यात या गाण्याचे शब्द आणि न बसणारी चाल या सर्वांमुळे हे गाणं एका वेगळ्याच उंचीला गेले आहे असे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. गाण्याचे शब्द ‘पागल हो के नाचो और नाच नाच के पागल हो जाओ’ असे असले तरी हे गाणं ऐकून ऐकून नेटकरी वेडवाल्याचे चित्र ट्विटवर दिसत आहे. या भयंकर कलाकृतीसाठी ढिंच्याक पूजाला नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhinchak pooja new song viral on social media