Dhirajlal Shah Death : प्रसिद्ध चित्रपट निर्माते धीरजलाल शाह यांचे निधन, अजय देवगण, सनी देओलच्या चित्रपटांची केली होती निर्मिती

बॉलीवूडमधील प्रसिद्ध निर्माते म्हणून धीरजलाल शाह (Dhirajlal Shah Death) यांची ओळख होती.
Dhirajlal Shah Death News
Dhirajlal Shah Death Newsesakal

Dhirajlal Shah Death: बॉलीवूडमधील चित्रपट निर्माते धीरजलाल शाह यांचे निधन झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका दुर्धर आजारानं त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. बॉलीवूडमधील प्रख्यात चित्रपट निर्माते म्हणून त्यांनी त्यांच्या नावाची वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या जाण्यानं बॉलीवूडमध्ये शोककळा पसरली आहे.

प्रसिद्ध अभिनेता अजय देवगण, सनी देओल यांच्या चित्रपटांचे निर्माते म्हणून त्यांची ओळख होती. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील एका रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. मागील महिनाभपासून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

Dhirajlal Shah Passed away
Dhirajlal Shah Passed away

निर्माते शाह यांचे बंधू हसमुख यांनी धीरजलाल शाह यांच्या निधनाची बातमी दिली असून त्यांनी सांगितले की, त्यांना कोविडची लागण झाली होती. त्यानंतर श्वसनास अडथळा निर्माण होत होता. त्यांना आयसीयुमध्ये दाखल करण्यात आले होते. किडनी आणि ह्दयात बिघाड झाल्यानंतर त्यांची प्रकृती आणखी खालावत गेली.

शाह यांच्याबाबत सांगायचे झाल्यास त्यांनी बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या अनेक चित्रपटांची निर्मिती केली होती. तसेच अजय देवगणच्या विजयपथची निर्मिती त्यांनी केली होती. धीरजलाल शहा यांनी दिग्दर्शक अनिल शर्मा यांच्या द हिरो- लव स्टोरी ऑफ ए स्पायची निर्मिती करुन प्रेक्षकांना निखळ आनंद दिला होता. अनिल शर्मा यांच्या त्या चित्रपटामध्ये सनी देओल, प्रीति झिंटा आणि प्रियंका चोप्रा यांच्या भूमिका होत्या.

Dhirajlal Shah Death News
Oscar 2024 : एम्मा ते मार्गोटच्या रेड कार्पेट लूकची चर्चा! कॅमेऱ्यांचा क्लिकक्लिकाट अन् चाहत्यांच्या प्रतिक्रियांना उधाण

शाह यांच्या निधनाची बातमी समोर येताच बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. त्यात दिग्दर्शक आणि निर्माते अनिल शर्मा यांनी म्हटले आहे की, ते केवळ चांगले निर्माते म्हणून नव्हे तर एक प्रेमळ व्यक्तिमत्व म्हणूनही परिचित होते. त्यांनी त्यांच्या कारकीर्दिमध्ये जे काही केलं ते प्रेरणादायी आहे. चित्रपटांकडे पाहण्याचा त्यांचा वेगळा दृष्टिकोन होता.

निर्माता हरीश सुगंध यांनी म्हटले आहे की, त्यांनी शहेनशाह चित्रपटाच्या व्हिडिओचे अधिकार खरेदी केले होते. त्यानंतर त्यांच्या आयुष्यानं वेगळा टर्न घेतला. ते व्हिडिओचे प्रॉडक्शनचे किंग झाले होते. अनेक चित्रपटांच्या व्हिडिओचे राईट्स त्यांच्याकडे होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com