
Dholkichya Talavar: कोकण कन्या नेहा ठरली ‘ढोलकीच्या तालावर’ची विजेती! तर धुळ्याचा शुभम उपविजेता..
Dholkichya Talavar winner Neha Patil: मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय कार्यक्रम 'ढोलकीच्या तालावर' हा गेल्या काही दिवासांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत होता. उत्कृष्ट लावणी नृत्यांगनांनी यावेळी ‘ढोलकीच्या तालावर’चं पर्व चांगले रंगतदार केले. कलर्स मराठीवरील या शोने सर्वानाच थिरकायला भाग पाडले. ‘ढोलकीच्या तालावर’चा महाअंतिम सोहळा रविवारी मोठ्या उत्साहात पार पडला.
पेणची नेहा पाटील हिने ‘ढोलकीच्या तालावर’ या कार्यक्रमाच्या ट्रॉफीवर आपलं नावं कोरलं. नेहाने पहिल्या दिवसापासूनच तिच्या उत्तम नृत्याने आणि मनमोहक अदाकारीनं सर्वांचं लक्ष वेधलं होतं. अखेर तिने मेहनतीने आणि दमदार नृत्य कौशल्याने हा सन्मान मिळवला.
तर 12 मुलींमध्ये आत्मविश्वासाने आणि तितक्याच कौशल्याने लावणी सादर करणारा शुभम बोराडे हा या सिझनचा उपविजेता ठरला. नम्रता सांगुळे ही या कार्यक्रमाची द्वितीय उपविजेती ठरली.
टॉप स्पर्धकांमध्ये शुभम बोराडे आणि नेहा पाटील , समता आमणे, नम्रता सांगुळे, पूर्वा साळेकर, तनुजा शिंदे यांनी मजल मारली होती. या सहा स्पर्धकांनी दमदार लावणी करत एकमेकांना चांगलीच टक्कर दिली होती. यात शेवटी पण यात शुभम बोराडे, नम्रता सांगुळे आणि नेहा पाटील यांनी बाजी मारली.
ज्याची पाहिली उत्सुकतेने वाट, तो क्षण येऊन ठेपला पुढ्यात!
महाराष्ट्राची 'लावणी सम्राज्ञी', नेहा पाटीलने मिळवला सर्वोच्च मान! असं कॅप्शन देत ही पोस्ट शेयर करण्यात आली आहे.
यंदाच्या ‘ढोलकीच्या तालावर’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बिगबॉस फेम अक्षय केळकरनं उत्तमरित्या केलं. तर क्रांती रेडकर, सुप्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक आणि लेखक अभिजित पानसे आणि नृत्य दिग्दर्शक आशिष पाटील यांनी परीक्षणाची खुर्ची सांभाळली.