शिवाजीनगर : धुरळा या मराठी चित्रपटाच्या टीमने ‘सकाळ’ कार्यालयाला भेट दिली. या वेळी (डावीकडून) सोनाली कुलकर्णी, प्रसाद ओक, सई ताम्हणकर, अलका कुबल, झी स्टुडिओचे मंगेश कुलकर्णी,  (खाली बसलेले) सिद्धार्थ जाधव, अमेय वाघ, अंकुश चौधरी व निर्माते अनिश जोग.
शिवाजीनगर : धुरळा या मराठी चित्रपटाच्या टीमने ‘सकाळ’ कार्यालयाला भेट दिली. या वेळी (डावीकडून) सोनाली कुलकर्णी, प्रसाद ओक, सई ताम्हणकर, अलका कुबल, झी स्टुडिओचे मंगेश कुलकर्णी, (खाली बसलेले) सिद्धार्थ जाधव, अमेय वाघ, अंकुश चौधरी व निर्माते अनिश जोग.

Video : हवा करण्यासाठी धुरळा चित्रपट सज्ज!

पुणे - ‘हवा कुणाची रं, हवा आपलीच रं’, असे म्हणत नव वर्षाच्या सुरुवातीलाच चित्रपटसृष्टीत राजकीय हवा करण्यासाठी ‘धुरळा’ हा मराठी चित्रपट सज्ज आहे. देशपातळीवर राजकारण कितीही गाजलं, तरी त्याची खरी सुरुवात होते ती गावापासून. अशाच एका गावातील सरपंचपदाच्या निवडणुकीचा धुरळा उडतो आणि सुरू होतो राजकीय चढाओढीचा खेळ. यात कोण जिंकतं, कोणाची मात होते, हे ३ जानेवारीलाच समजेल.

अंकुश चौधरी, प्रसाद ओक, सिद्धार्थ जाधव, अमेय वाघ, अलका कुबल, सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, उमेश कामत अशी तगडी स्टारकास्ट घेऊन दिग्दर्शक समीर विद्वांस व लेखक क्षितीज पटवर्धन राजकीय धुरळा उडवण्यासाठी तयार आहेत. गावाकडचे राजकारण, भाषा, पोशाख अशा अनेक गोष्टींमुळे सर्व कलाकारांच्या अभिनयाचा कस लागला आहे. 

‘‘भावनाप्रधान भूमिका साकारणारी अभिनेत्री अशी प्रतिमा या चित्रपटामुळे पूर्णपणे बदलून गेली आहे’’, असे अलका कुबल यांनी सांगितले. ‘‘क्षितीज पटवर्धनने आम्हाला पात्रांची बारीकसारीक इतकी माहिती दिली होती की, त्यामुळे आम्हाला भूमिका समजायला अत्यंत सोपं गेलं’’, असे मत सई ताम्हणकरने व्यक्त केले.

‘‘प्रत्येक नेत्याची सुरुवात ही स्थानिक राजकारणापासून सुरुवात होते आणि असाच राजकारणी पुढे जाऊन मोठ्या पदांवर काम करतो, याचीच गोष्ट सांगणारा हा चित्रपट आहे,’’ असे अंकुश चौधरीने सांगितले. ‘‘दिग्दर्शकाच्या भूमिकेतून अभिनेत्याच्या भूमिकेत आणि तेही एक महत्त्वाचे पात्र साकारताना मजा आली’’, असे प्रसाद ओकने सांगितले. सिद्धार्थ जाधवने त्याच्या व सोनाली कुलकर्णीच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीबद्दल सांगितले. सोनाली कुलकर्णी तिच्या मोनिका या पात्रात इतकी समरसून गेली होती, की त्या गावकऱ्यांपैकीच ती एक आहे असे वाटत होते, अशी आठवण तिने शेअर केली.

‘‘प्रत्येक भूमिका जी आपण साकारतो ती एकमेकांपेक्षा वेगळी असायला हवी. या सर्वात संहिता एक महत्त्वाचे पात्र वठवते,’’ असे अमेय वाघने सांगितले. ‘‘नव्या वर्षाचीच नव्हे, तर नव्या दशकाची ‘धुरळा’दार सुरुवात झी स्टुडिओजच्या माध्यमातून करतोय’’, असे झी स्टुडिओजचे बिझनेस हेड मंगेश कुलकर्णी यांनी सांगितले. ‘‘सात वर्षांपासूनची संकल्पना आता सत्यात उतरत असल्याने आनंद होतोय’’, अशी प्रतिक्रिया निर्माते अनिश जोग यांनी दिली. झी स्टुडिओज, अनिश जोग व रणजित गुगळे यांची निर्मिती असलेला ‘धुरळा’ अनेक वर्षांनी राजकारणावर भाष्य करेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com