3 तास विमानात अडकून पडलो,मदतही मागितली पण..' एअरलाइनवर दिया मिर्झाचा आरोप Dia Mirza | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dia Mirza

'3 तास विमानात अडकून पडलो,मदतही मागितली पण..' एअरलाइनवर दिया मिर्झाचा आरोप

अभिनेत्री दिया मिर्झाचं(Dia Mirza) एक ट्वीट(Tweet) सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या ट्वीटमधून तिनं विस्तारा एअरलाइनच्या(Vistara Airline) निष्काळजी व्यवहाराचा उल्लेख केला आहे. यासोबतच तिनं एअरलाइनविरोधात तक्रार देखील केली आहे. दिया मिर्झानं शनिवारी २१ मे,२०२२ रोजी एक ट्वीट केलं आहे. ज्यामध्ये तिनं सांगितलं आहे की,'सुरुवातील विमानाला डायवर्ट केलं गेलं. नंतर विमानातील प्रवाशांना वाट पहायला सांगितलं गेलं. इतकंच नाही तर एअरलाइनच्या स्टाफनं येऊन साधी प्रवाशांना काही मदत हवी आहे का याचीही दखल घेतली नाही. प्रवाशांचा सामानाच्या बाबतीतही गोंधळ झाला. ते कुठे आहे काहीच कळलं नाही''.

दियाने २१ मे रोजी सकाळी ३ वाजता केलेल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे,''विस्तारा फ्लाइट UK940 जी मुंबईहून दिल्लीसाठी जाणार होती,तिला जयपूरच्या दिशेनं डायवर्ट केलं गेलं. त्यानंतर प्रवाशांना वाट पहा असं सांगितलं गेलं. दियानं सांगितलं तब्बल ३ तास प्रवाशांना विमानात बसून वाट पहावी लागली. आणि एवढ्या वेळात त्यांना खाली उतरायची देखील परवानगी दिली गेली नाही. आणि या तीन तासात कोणताही एअरपोर्ट अधिकारी किंवा विस्तारा एअरलाइनचा स्टाफ आमच्या मदतीसाठी तिथे फिरकले नाहीत. आमच्या कोणत्याही प्रश्नांना उत्तरं द्यायला तिथे कुणी आलंच नाही. आमच्या बॅग्ज कुठे आहेत याची देखील माहिती आम्हाला दिली गेली नाही''.

हेही वाचा: IPL फायनल मॅचमध्ये असं कधीच घडलं नव्हतं, मात्र आमिर खान घडवून आणणार, वाचा..

विस्तारा एअरलाइननं २१ मे रोजी रात्री १०.३७ वाजता ट्वीट करुन सांगितलं होतं की,''दिल्लीत खराब हवामानामुळे फ्लाइट जयपूरच्या दिशेने डायवर्ट केलं गेलं आहे''. या एअरलाइनच्या ट्वीटवर अनेक विमान प्रवाशांनी प्रतिक्रिया नोंदवत आपापल्या तक्रारींचा पाढा वाचला आहे. दिया मिर्झाप्रमाणेच इतरही अनेक विमान प्रवाशांनी फ्लाइट कॅन्सल झाल्यानं झालेला त्रास आणि त्यानंतर न मिळालेली एअरलाइनची मदत याविषयी म्हटलं आहे.

हेही वाचा: पृथ्वीराज चौहान राजपूत की गुर्जर राजा? अक्षयचा 'पृथ्वीराज' सापडला वादात

अचानक फ्लाइट कॅन्सल करुनही प्रवाशांना स्वतःची व्यवस्था स्वतःच करावी लागल्यानं व्यक्त केलेली नाराजगी या प्रतिक्रियांच्या माध्यमातून दिसून आली. काही नेटकऱ्यांनी तर केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना हे ट्वीट टॅग करत मदतीची हाक मारली. काही नेटकऱ्यांनी तर थेट मंत्र्यांकडे खायला-प्यायला काहीतरी पाठवा अशी देखील मागणी केली.

दिया मिर्झा सध्या ग्रेटर नोएडा मध्ये 'धक धक' सिनेमाचं शूट करत आहे. या विमान प्रवासात तिच्यासोबत एक वर्षाचा मुलगा अव्यान देखील होता. या सिनेमात फातिमा सना शेख,रत्ना पाठक शाह,संजना सांघी असे कलाकार आहेत. तापसी पन्नू या सिनेमाची सह-निर्माती आहे आणि तरुण दुडेजा या सिनेमाचा दिग्दर्शक आहेत. या सिनेमात चार महिलांच्या स्ट्रगलची कहाणी दाखविली जाणार आहे. २०२३ मध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Dia Mirza Got Angry On Vistara Said Stuck In The Aircraft For Three Hours But Did Not Get

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..