esakal | करीना-सैफच्या दुसऱ्या मुलाचं ठरलं 'हे' नाव?
sakal

बोलून बातमी शोधा

saif kareena taimur

करीना-सैफच्या दुसऱ्या मुलाचं ठरलं 'हे' नाव?

sakal_logo
By
स्वाती वेमूल

अभिनेत्री करीना कपूर खान Kareena Kapoor Khan आणि सैफ अली खानच्या Saif Ali Khan घरी यावर्षी २१ फेब्रुवारी रोजी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले. करीनाने अद्याप तिच्या दुसऱ्या मुलाचा चेहरा सोशल मीडियावरील फोटोंमध्ये दाखवला नसून त्याचे नाव काय ठेवण्यात आले, हेसुद्धा जाहीर करण्यात आले नाही. मात्र 'बॉम्बे टाइम्स'ने नुकत्याच दिलेल्या एका वृत्तानुसार, करीना आणि सैफ सध्या त्यांच्या दुसऱ्या मुलासाठी विविध नावांचा विचार करत आहेत. मात्र तोपर्यंत चिमुकल्याला 'जे' (Jeh) या नावाने हाक मारण्यात येत आहे. (did Kareena Kapoor Khan and Saif Ali Khan name their new born Jeh)

करीना व सैफ 'जे' याच नावावर शिक्कामोर्तब करणार का, हे अद्याप निश्चित नाही. मात्र हे दोघं इतरही काही नावांचा विचार करत आहेत. सैफच्या वडिलांच्या नावावरून मुलाचं नाव 'मन्सूर' ठेवण्याचाही विचार सुरू असल्याचं म्हटलं जातंय. सैफच्या वडिलांचं नाव मन्सूर अली खान पतौडी असं आहे. याआधी तैमुरच्या नावावरून सोशल मीडियावर मोठा वाद झाला होता. त्यामुळे सैफ-करीना त्यांच्या दुसऱ्या मुलाचं नाव काय ठेवणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

करीनाने सोशल मीडियावर मुलाचे फोटो पोस्ट करतानाही विशेष काळजी घेतली आहे. कोणत्याही फोटोमध्ये तिने चेहरा दाखवलेला नाही. 'मदर्स डे'च्या निमित्ताने तिने तैमुर आणि त्याच्या छोट्या भावाचा फोटो पोस्ट केला होता. तैमुर सध्या चार वर्षांचा आहे. ऑगस्ट २०२० मध्ये करीना गरोदर असल्याची आनंदाची बातमी सैफ अली खानने सोशल मीडियावर दिली होती.

सैफ व करीनाने २०१२ मध्ये लग्न केलं. 'टशन' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. २० डिसेंबर २०१६ रोजी तैमुरचा जन्म झाला. दुसऱ्या बाळाच्या जन्माआधी सैफ व करीना नवीन घरात राहायला गेले. गरोदरपणादरम्यान करीना चित्रपटाचे शूटिंग, जाहिरातींसाठी काम करत होती. याशिवाय गरोदरपणातील योगसाधनेचं महत्त्वसुद्धा ती सोशल मीडियावरील पोस्टद्वारे पटवून देत होती.

loading image