सलमानला का आवडली नाही 'इन्शा अल्लाह'ची स्क्रीप्ट?

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 ऑगस्ट 2019

मुंबई : पुढच्या वर्षी म्हणजेच 2020 च्या ईदला सलमान खान नक्की कोणता सिनेमा घेऊन येणार याची चर्चा सर्वत्र आहे. ट्विवरच्या माध्यमातून सलमानने आणि भन्साळी प्रोडक्शनच्या अधिकृत अकाउंटवरुन 'इन्शा अल्लाह' ची रीलिज डेट पुढे ढकलण्यात आल्याच सांगण्यात आलं.  'इन्शा अल्लाह'चं शुटिंग अद्याप चालू झालं नाही. त्याचं काम कधी सुरु होईल याविषयीची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. अशामध्ये भाईजान या चित्रपटामध्ये काम करणार नसल्याची चर्चादेखील होत आहे. जाणून घ्या काय आहे त्यामागचं कारण.

एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये सलमानने अशी माहिती दिली की," 'खामोशी' या चित्रपटावर काम करण्याआधीपासूनच मी आणि संजय मित्र आहोत. अभिनेत्री मनीषा कोईरालाच्या माध्यामातून संजय मला भेटायला आले होते. त्यानंतर आम्ही 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटात एकत्र काम केलं. या चित्रपटाची स्क्रिप्ट मला आवडली होती. त्यामुळे संजय लीला भन्साळी यांच्यासोबत काम करण्याचा विचार केला. एक गोष्ट मी सांगू इच्छितो की, संजय त्यांच्या चित्रपटासोबत कोणतीही गद्दारी करणार नाहीत. माझी इच्छा आहे की, त्यांच्या इच्छेप्रमाणे सिनेमा करावा. या कारणाने आमच्या मैत्रीत कोणताही फरक येणार नाही. मला विश्वास आहे की, संजय त्यांच्या मनात कोणताही द्वेष ठेवणार नाहीत. त्यांच्या प्रत्येक प्रोजेक्टसाठी मी शुभेच्छा देतो.  मी आणि संजय भविष्यात नक्कीच काम करु. इन्शा अल्लाह!".

सलमानला 'इन्शा अल्लाह' हा चित्रपट न करण्यामागे अनेक कारणे सांगितली जात आहेत.  मिड डे ला सुत्रंनी दिलेल्या माहितीप्रमाणे, सलमानला चित्रपटामध्ये काही बदल करायचे होते. पहिल्या एका तासाची स्क्रिप्ट भाईजानला आवडली होती मात्र चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये बदल हवा होता.  'इन्शा अल्लाह' या चित्रपटाविषयी संजय लीला भन्साळी आणि सलमान खान यांच्यामध्ये मतभेद होते. त्यामुळे सिनेमाचं शुटिंग थांबवण्यात आलं आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Did salman khan not liked the script of Insha Allah