घराचं भाडं तब्बल ९५ हजार रुपये; सलमाननं केला करार

सलमानने ३३ महिन्यांसाठी हे घर भाडेतत्त्वार दिलं आहे.
Salman Khan
Salman Khan sakal media

अभिनेता सलमान खान (Salman Khan) मुंबईतील वांद्रे परिसरातील 'गॅलेक्सी' अपार्टमेंटमध्ये त्याच्या कुटुंबीयांसोबत राहतो. सलमानने त्याचं मुंबईतील आणखी एक घर भाडेतत्त्वावर दिलं असून त्याचं भाडं ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. वांद्रे पश्चिम याठिकाणी शिव अस्थान हाइट्स या इमारतीतील १४व्या मजल्यावर हे घर आहे. ७५६ चौरस फुटांवर असलेल्या या घराचा करार ६ डिसेंबर रोजी झाला आहे. सलमानने ३३ महिन्यांसाठी हे घर भाडेतत्त्वार दिलं आहे. 'मनीकंट्रोल'ने दिलेल्या वृत्तानुसार सलमानच्या या घराचं भाडं दर महिना तब्बल ९५ हजार रुपये इतकं आहे. भाडेकरूने करारावर स्वाक्षरी करताना २.८५ लाख रुपये डिपॉझिट म्हणून भरले आहेत, ज्यामध्ये पाच टक्के वाढीच्या कलमाचादेखील उल्लेख आहे.

सलमानने काही महिन्यांपूर्वी त्याच्या 'गॅलेक्सी' अपार्टमेंटजवळ आणखी एक दुमजली फ्लॅट भाडेतत्त्वावर घेतलं आहे. रिअल इस्टेट पोर्टलने दिलेल्या वृत्तानुसार, सलमान खान वेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडकडून भाडे करार निश्चित करण्यात आला होता. वांद्रे इथल्या मक्बा हाइट्स या इमारतीमधील १७ आणि १८व्या मजल्यावरील हे फ्लॅट्स आहेत. बाबा सिद्दिकी आणि झिशान सिद्दिकी हे या फ्लॅट्सचे मालक आहेत. सलमानकडून ११ महिन्यांसाठी हा करार करण्यात आला असून हा दुमजली फ्लॅट २,२६५ चौरस फुटांवर पसरलेला आहे. भाड्याने घेतलेला हा दुमजली फ्लॅट सलमान खानच्या कंपनीसाठी काम करणाऱ्या लेखकांसाठी वापरतो.

Salman Khan
'मिस युनिव्हर्स' हरनाजने काढला मांजरीचा आवाज; संतापलेले नेटकरी म्हणाले..

सलमानच्या चित्रपटांविषयी बोलायचे झाल्यास, त्याचा 'अंतिम : द फानयल ट्रुथ' हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. यामध्ये त्याचा मेहुणा आयुष शर्माने खलनायकी भूमिका साकारली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. याशिवाय तो शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. 'टायगर ३', 'कभी ईद कभी दिवाली' आणि 'किक २' हे चित्रपटसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com