Vijay Varma :शेवटी तोच तमन्नाच्या दिलाचा दिलबर! फोटोनं सारं काही सांगितलं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tamanna Bhatia and vijay varma

Vijay Varma :शेवटी तोच तमन्नाच्या दिलाचा दिलबर! फोटोनं सारं काही सांगितलं

बॉलिवूड अभिनेता विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया त्यांच्या प्रेमप्रकरणामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. आता 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी विजय वर्माने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे.

हा फोटो पाहून चाहत्यांचा अंदाज आहे की अभिनेत्याने तमन्ना भाटियासोबतचे नाते अधिकृत केले आहे.

काही काळापासून विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया यांची नावे एकत्र जोडली जात आहेत. दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. त्यामुळे डेटिंगच्या अफवांना उधाण आले. आता विजय वर्माने व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने असाच एक फोटो शेअर केला आहे, ज्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. जरी अभिनेत्याने फोटोत कोणालाही टॅग केले नाही.

फोटोबद्दल बोलायचे झाले तर, विजयनं इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट केली आहे. या फोटोमध्ये एका बाजूला जिथे विजयचा पाय दिसत आहे, तर दुसऱ्या बाजूला दिसणारा पाय तमन्नाचा असल्याचे म्हटले जात आहे. आणि त्यासोबत लाल हार्ट इमोजी पोस्ट केला आहे.

या पोस्टनंतर चाहत्यांचा अंदाज आहे की दोघांनीही त्यांचे नाते अधिकृत केले आहे. अभिनेत्याने तमन्नाला पोस्टमध्ये टॅग केले नाही. पण, असे असूनही दोघेही एकमेकांना डेट करत असल्याची चाहत्यांना आता खात्री पटली आहे.

हा फोटो समोर आल्यानंतर चाहत्यांनी त्याचे अकाउंट शोधण्यास सुरुवात केली. नंतर कळले की या शूजसह अभिनेत्रीला मुंबई विमानतळावर अनेकदा स्पॉट केले गेले आहे.

या शूजमुळे दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याचे चाहत्यांना वाटू लागले आहे. मात्र, याबाबत अभिनेत्याच्या बाजूने कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.

वृत्तानुसार, विजय वर्माने 2019 मध्ये रिलीज झालेल्या 'गली बॉय'ला चार वर्षे पूर्ण झाल्याबद्दल हा फोटो पोस्ट केला आहे. याच कारणामुळे त्याने आपल्या इंस्टाग्रामवर दोन पायांच्या जोडीचा फोटो शेअर केला आहे. सध्या हे फोटो इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

vijay varma

vijay varma

याआधीही दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आले आहे. याआधी त्यांचा एक किसिंग व्हिडिओ व्हायरल झाला होता. यानंतर दोघेही लंच डेटमध्ये स्पॉट झाले. आता हा फोटो व्हायरल झाल्यानंतर हे दोघे त्यांचे नाते कधी अधिकृत करणार याची चाहत्यांना प्रतीक्षा आहे.