Miss World आणि Miss Universe स्पर्धेत नेमका काय आहे फरक?

अनेक लोक मिस वर्ल्ड (Miss World) आणि मिस युनिव्हर्स (Miss Universe) स्पर्धेला एकच समजतात.
Difference Between Miss World and Miss Universe
Difference Between Miss World and Miss UniverseEsakal

Difference Between Miss World and Miss Universe : भारताच्या हरनाज संधू (Harnaaj Sandhu) हिने काल 'मिस युनिव्हर्स'(Miss Universe-2021) स्पर्धा जिंकली. तब्बल 21 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर भारताला (India) या स्पर्धेचे विजेतेपद मिळालं. यापूर्वी 1994 मध्ये सुष्मिता सेन (Sushmita Sen) आणि 2000 मध्ये लारा दत्ता (Lara Datta) या दोघींनीच मिस युनिव्हर्स स्पर्धा जिंकली होती. आता तुम्हाला प्रश्न पडेल की या तिघींनीच जर ही स्पर्धा जिंकली असेल तर ऐश्वर्या राय (Aishwarya Rai), प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra), मनुषी छिल्लर (Manushi Chhillar) यांनी कोणती स्पर्धा जिंकली होती?

ऐश्वर्या, प्रियांका, मनुषी यांनी जिंकलेली स्पर्धा म्हणजे 'मिस वर्ल्ड' (Miss World). बऱ्याच लोकांना मिस वर्ल्ड आणि मिस युनिव्हर्स या स्पर्धांतील फरकच माहिती नाही. लोक या दोन्ही स्पर्धांना एकच समजतात. पण या दोन्ही भिन्न स्पर्धा आहेत. आज आपण या दोन्ही स्पर्धांबद्दल जाणून घेणार आहोत.

Difference Between Miss World and Miss Universe
21 वर्षांनंतर भारताकडे 'मिस युनिव्हर्स'; हरनाज संधूने कोरलं नाव

मिस वर्ल्ड आणि मिस युनिव्हर्स (Miss World and Miss Universe)-

तसं पाहिलं तर मिस वर्ल्ड (Miss world) आणि मिस युनिव्हर्स (Miss Universe) यां दोन्ही स्पर्धाच्या कार्यक्रमांत संयोजकांव्यतिरिक्त फारसा फरक नाही. दोन भिन्न आयोजकांद्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या या दोन्हीही लोकप्रिय सौंदर्य स्पर्धा आहेत. वर्षभर जगभरात विविध सौंदर्य स्पर्धांचे आयोजन केले जाते. जगभरातून पुढे आलेल्या अनेक सुंदरीतून एक विश्व सुंदरी किंवा मिस युनिव्हर्स निवडण्यासाठी विशिष्ट पद्धत वापरली जाते. तथापि जागतिक स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या येत असलेल्या या दोन प्रख्यात सौंदर्य स्पर्धांमध्ये मिस वर्ल्ड आणि मिस युनिव्हर्स या स्पर्धांच्या बाबतीत लोकांच्या मनात अनेक गैरसमज आहेत. अनेक लोक मिस युनिव्हर्स स्पर्धेला मिस वर्ल्डपेक्षा उच्च दर्जाची मानतात, पण असं काहीही नाही.

Difference Between Miss World and Miss Universe
'मिस युनिव्हर्स'चा किताब जिंकणाऱ्या भारतीय सौंदर्यवती

मिस वर्ल्ड- (Miss World)

मिस वर्ल्ड ही स्पर्धा दरवर्षी महिलांसाठी आयोजित केली जाते. मिस वर्ल्डची सुरुवात 1951 मध्ये युनायटेड किंगडममध्ये (united kingdom) झाली. ज्यामध्ये अनेक देशांतील महिला सहभागी होतात. यामध्ये त्यांचा सुंदर चेहरा, त्यांची देहबोली, त्यांची विनोदबुद्धी, त्यांच्या कलागुणांना न्याय दिला जातो, त्यानंतर ज्युरी सदस्य त्यांचे निकाल देतात. विश्व सुंदरी स्पर्धेत जास्त विजेतेपद ही युरोपियन महिलांना मिळाल्याचे दिसून येते. भारताच्या मिस वर्ल्ड विजेत्यांमध्ये ऐश्वर्या राय, प्रियांका चोप्रा, मनुषी छिल्लर यांचा समावेश आहे.

Difference Between Miss World and Miss Universe
पाहा भारतातील आज पर्यंत झालेल्या मिस युनिव्हर्स आणि मिस वर्ल्ड

जगत् सुंदरी (मिस युनिव्हर्स -Miss Universe)-

मिस युनिव्हर्सला म्हणजेच जगत् सुंदरी म्हणतात, मिस वर्ल्ड सारखीच ही स्पर्धा दरवर्षी मिस युनिव्हर्स संस्थेद्वारे आयोजित केली जाते. ही वार्षिक आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धा आहे. या स्पर्धेची सुरुवात कॅलिफोर्निया, युनायटेड स्टेट्समधील पॅसिफिक मिल्स या कंपनीने 1952 मध्ये केली होती. 1996 मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी तिचे हक्क मिळवले. मिस युनिव्हर्स स्पर्धेत अमेरिकेच्या स्पर्धकांनी जिंकली आहे. भारतातकडून सुष्मिता सेन हिने 1994 मध्ये सर्वप्रथम ही स्पर्धा जिंकली होतो. त्यानंतर 2000 साली लारा दत्ता आणि त्यानंतर 2021 मध्ये हरनाज सिंधू हिने मिस युनिव्हर्स हा किताब जिंकला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com