अमोल कोल्हे संतापले.. दिग्पाल लांजेकरने मागितली हात जोडून माफी|digpal lanjekar apology after seen dr. amol kolhe vedio | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

digpal lanjekar  and amol kolhe

अमोल कोल्हे संतापले.. दिग्पाल लांजेकरने मागितली हात जोडून माफी

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत 'शेर शिवराज' (sher shivraj) हा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटाला चाहत्यांचे भरभरून प्रेम मिळत आहे. सध्या या चित्रपटाचे सर्व शो हाऊसफुल्ल होताना दिसत आहेत. अफजलखान वधावरील या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले असते तरी प्रेक्षकांमुळेच मोठी अडचण निर्माण झाली आहे.

हेही वाचा: मी सासू असले तरी आईसारखीच वागते : ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी

दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (digpal lanjekar) यांना टॅग करून एका चाहत्याने करून एक प्रतिक्रिया सोशल मीडियावर शेअर केली होती. यात त्या चाहत्याने दिग्पाल लांजेकर यांच्या दिग्दर्शनाचे मोठे कौतुक केलेले पाहायला मिळाले. मात्र हे कौतुक होत असताना डॉ. अमोल कोल्हे (amol kolhe) यांच्यावर त्याने टीका केली. कोल्हे यांच्या आडनावाचा वापर करून ‘टीव्हीच्या पडद्यावर शिवराय आणि शंभूराजे म्हणजे मीच अशी कोल्हेकुई बंद करून शेर शिवराज हे असे असतात हे सिद्ध करणारा चिन्मय मांडलेकर (chinmay mandlekar) यांचा जबरदस्त अभिनय असलेला चित्रपट.’ अशी आक्षेपार्ह प्रतिक्रिया त्याने दिली.

हेही वाचा: अजान भोंग्यातूनच दिली पाहिजे असंं कुठं लिहीलय का.. 'भोंगा' चित्रपटाचा खणखणीत ट्रेलर..

ही प्रतिक्रिया डॉ. अमोल कोल्हे यांच्यापर्यंत पोहोचल्यावर कोल्हे यांनी नाराजी व्यक्त केली. संबंधित मजकूर लिहिलेली पोस्ट डॉ. अमोल कोल्हे यांनी स्क्रीनशॉटसह शेअर केली. ‘आजवर प्रत्येकवेळी छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारताना मी कायमच त्या थोर व्यक्तिरेखांना नतमस्तक होत प्रामाणिक प्रयत्न केला आहे. तसेच प्रत्येकाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मान ठेवून इतरांच्या सादरीकरणावर कधीही भाष्य केले नाही उलट कौतुकच केले. असे असताना अशा प्रकारची पोस्ट लिहिणाऱ्यांचे व ती शेअर करणाऱ्यांचे मनःपूर्वक आभार!’ अशा शब्दात कोल्हे यांनी नाराजी दर्शवलेली.

डॉ. अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर याबाबत नाराजी जाहीर करताच दिग्पाल लांजेकर यांनी त्यांची माफी मागिलती आहे. 'माझ्या एका चाहत्याने लिहिलेली पोस्ट अनावधानाने शेअर करण्यात आली जी मी काही वेळापूर्वीच डिलीट केली आहे. शेर शिवराज चित्रपट निमित्त चाहत्यांनी भरभरून पोस्ट लिहिल्या होत्या. त्यात ही एक पोस्ट होती त्यातील पहिल्या काही ओळी वाचून अनावधानाने ती शेअर करण्यात आली. परंतु लगेच या पोस्टमध्ये अशा प्रकारचं काहीतरी लिहिण्यात आलं आहे तेव्हा ती पोस्ट काही मिनिटातच डिलीट करण्यात आली. दुर्दैवाने या पोस्टचा स्क्रीनशॉट कोणी काढला असेल. पण मी या सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छीतो की, छत्रपती शिवाजी महाराजांची उत्तम भूमिका साकारणाऱ्या इतक्या मोठया कलाकाराबद्दल माझ्या मनात कधीही आकस नाही आणि कधी नसेल.’ असे म्हणत दिग्पाल लांजेकर यांनी डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली आहे.

Web Title: Digpal Lanjekar Apology After Seen Dr Amol Kolhe

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top