
मी सासू असले तरी आईसारखीच वागते : ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी
झी मराठी (zee marathi) वरील नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आलेली 'तू तेव्हा तशी' (tu tevha tashi) ही मालिका आणि त्यातील व्यक्तिरेखा प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत. सौरभ आणि अनामिका सोबतच मालिकेतील एक सगळ्यात गोड व्यक्तिरेखा म्हणजे अनामिकाची आई. सुहास जोशी ही भूमिका अत्यंत चोख बजावत आहेत. त्यांच्या अभिनय कारकिर्दीतील यशस्वी प्रवासाबद्दल साधलेला हा खास संवाद
हेही वाचा: अजान भोंग्यातूनच दिली पाहिजे असंं कुठं लिहीलय का.. 'भोंगा' चित्रपटाचा खणखणीत ट्रेलर..
१. तुमच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे, त्याबद्दल काय सांगाल?
- मी मालिकेत साकारत असलेली भूमिका ही खरंतर अनामिकाच्या सासूची आहे पण ती तिची सासू नसून आईच आहे. त्या दोघींचं नातं किंवा तिचं राधा म्हणजेच तिच्या नातीसोबत असलेलं नातं हे खूप गोड आहे. ती त्यांच्यासोबत मैत्रिणीसारखी वागते, त्यांच्या काळाप्रमाणे स्वतःला अपडेटेड ठेवते त्यामुळे ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना देखील त्यांच्यातली एक वाटतेय.
हेही वाचा: १५ वर्षांची असताना उर्फी जावेद पॉर्न साईटवर.. धक्कादायक माहिती समोर..
२. नाटक, चित्रपट की मालिका तुम्हाला सगळ्यात जास्त कुठलं माध्यम आवडतं?
- मला तिन्ही माध्यमं आवडतात. पण प्रेक्षकांची आवड वेगळी असू शकते. चित्रपट, मालिका बघून नाटकाकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. पण चित्रपट आणि नाटक हे दोन्ही प्रकार वेगळे आहेत. प्रत्येक माध्यमाची विशिष्ट जमेची बाजू असते तसंच त्याला काही प्रमाणात मर्यादाही असतात.
३. कुठल्या माध्यमात काम करणं जास्त आव्हानात्मक आहे?
- नाटक ही खरी कला आहे. ते करताना तुमचा खरा कस लागतो. प्रचंड मेहनत लागते आणि आपण केलेल्या मेहनतीची दखल घेतली जात असेल तर त्याचा कलाकाराला आनंद होतोच.
४. तरुण पिढीला काय सल्ला द्याल?
- आता स्पर्धा वाढली आहे. बऱ्याचदा जे नाट्यक्षेत्राकडे वळतात त्यांना तग धरता येतोच असं नाही. काही वेळा नाट्यक्षेत्राकडे एक शिडी म्हणून बघितलं जातं. त्यांना खरं तर मालिका आणि चित्रपटांमध्ये काम हवं असतं. प्रामाणिकपणे नाटकाकडे वळणारे कलाकार आज फार कमी आहेत. तरीही नाट्यक्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांनी मार्गदर्शन आणि प्रशिक्षणाशिवाय वळू नये.
Web Title: Marathi Actress Suhas Joshi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..