लाडक्या 'जेठालाल'चा आज वाढदिवस, 'तारक मेहता...'पूर्वी एक वर्ष नव्हतं काम

Dilip Joshi
Dilip JoshiSakal Digital

Dilip Joshi Birthday : Career, Journey all you need to know

तारक मेहता का उल्टा चष्मामधील (taarak mehta ka ooltah chashmah) जेठालाल अर्थात दिलीप जोशी यांना कोण ओळखत नाही. स्वतःच्या कॉमेडी शैलीने त्यांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. तर अशा या आपल्या लाडक्या जेठालालचा आज वाढदिवस आहे. पण एक काळ होता, जेव्हा त्यांनी अवघ्या 50 रुपयांनी आपल्या करिअरची सुरुवात केली होती. अनेक फिल्म्स, वेगवेगळे कॅरेक्टर्स निभावूनही म्हणावी तशी ओळख त्यांना निर्माण करता येत नव्हती. पण तारक मेहता या एका शो ने दिलीप जोशी यांना स्टार बनवलं. आज त्यांची संपत्ती कोट्यवधीत आहे, पण जुना काळ त्यांना कायम प्रेरीत करत राहतो असे दिलीप सांगतात... आज त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्याबद्दलच्या गोष्टी जाणून घेऊयात...

Dilip Joshi
सोनाली कुलकर्णीने घेतला खास उखाणा, हनिमूननंतर थेट सासरच्या सेवेत..

करिअरची सुरुवात
दिलीप जोशींनी त्यांच्या ऍक्टिंग करिअरची सुरुवात 33 वर्षांआधी अर्थात 1989 मध्ये केली. सलमान खानचा पहिला सुपरहिट सिनेमा अर्थात 'मैंने प्यार किया'मध्ये दिलीप जोशींनी 'रामू' चे कॅरेक्टर वठवलं होतं. यानंतर ते अनेक गुजराती नाटकांमध्ये दिसले. 'ये दुनिया है रंगीन' आणि 'क्या बात है' मध्ये त्यांनी साउथ इंडियन भूमिका केली होती. सलमान खानसह शाहरुख खानसोबतही दिलीप जोशी यांनी काम केले आहे. 'फिर भी दिल है हिंदुस्तानी'मधील त्यांची भूमिका दमदार होती. तर हम आपके है कौनधील भोला कोण विसरेल बरं ?

तब्बल एक वर्ष बेरोजगार
मोठमोठ्या स्टार्ससोबत सिनेमे केल्यानंतरही दिलीप करिअरसाठी संघर्ष करत होते. मग हळूहळू त्यांना काम मिळणं बंद झालं, एक वेळ अशी आली की तब्बल वर्षभर दिलीप जोशींना एकही काम मिळालं नाही. पण त्यानंतर दिलीप जोशींचं नशीब पालटलं आणि त्यांनी पुन्हा मागे वळून कधीही पाहिलं नाही.

स्टार जेठालाल
दिलीप जोशींना 'तारक 'मेहता का उल्टा चश्मा' मधला रोल ऑफर झाला. खरतंर त्यांना बाबूजी अर्थात चंपकलाल यांचा रोल ऑफर झाला होता. पण जेव्हा दिलीप यांनी स्क्रिप्ट वाचली तेव्हा आपण जेठालालचा रोल चांगला करु शकू असं वाटलं आणि त्यांनी याबाबत मेकर्सना सुचवलं आणि मग त्यांची या रोलसाठी ऑडिशन घेतली. त्यांचा ऑडीशनमधला परफॉर्मंन्स मेकर्सना खूप आवडला आणि जेठालाल मिळाला. जेठालाल या रोलचे दिलीप जोशी यांनी सोनं केलं.

14 वर्षांपासून जेठालालची जादू
2008 पासून दिलीप जोशी तारक मेहतामध्ये 'जेठालाल' चा रोल प्ले करत आहेत. त्यांची ऑनस्क्रीन बायको दिशा वकानीसह (दयाबेन) त्यांच्या जोडीला लोकांनी अक्षरश डोक्यावर घेतलं. लहान मुलंच काय तर मोठ्यांचीही ही अतिशय लाडकी जोडी बनली.

तारक मेहता का उल्टा चश्मा' शिवाय दिलीप जोशींनी अनेक टिव्ही सीरियल्समध्ये काम केले आहे. 1995 मध्ये 'कभी ये कभी वो', 1997 मध्ये 'क्या बात है' आणि 'शुभ मंगल सावधान' सारखे अनेक शोज आहेत. सिनेमांबाबत बोलायचे झाले तर 'यश', 'खिलाड़ी 420', 'हमराज', 'क्या दिल ने कहा', 'दिल है तुम्हारा', 'वॉट्स युअर राशी' सारख्या सिनेमात त्यांनी काम केले आहेय

Dilip Joshi
दिल, दोस्ती : मैत्रीची ‘रेशीमगाठ’!

कोट्यवधींची संपत्ती
दिलीप जेव्हा 12 वर्षांचे होते तेव्हापासून त्यांनी बॅकस्टेज आर्टिस्टच्या रुपात कामाला सुरुवात केली. त्यावेळी त्यांना फक्त 50 रुपये मिळायचे. 50 रुपये ते कोट्यवधीचे मालक हा प्रवास अतिशय खडतर होता, पण दिलीप जोशींनी हार मानली नाही. आता तारक मेहताच्या एका एपिसोडला ते एक - दिड लाख मानधन घेतात. त्यांची नेटवर्थ 45 कोटींच्या आसपास असल्याचे कळतंय. मुंबईत त्यांनी आलिशान घर घेतलंय. त्यांच्याजवळ महागड्या गाड्यांचेही कलेक्शन आहे. टीव्ही सिरियल शिवास जाहीराती, ब्रँड्सचे प्रमोशन, सोशल मीडियाच्या माध्यमातून ते चांगली कमाई करत आहेत.

कुटुंब आणि सोशल मीडिया (Dilip Joshi Family)
दिलीप जोशींचा जन्म पोरबंदरला एका गुजराती कुटुंबात झाला. त्यांनी BCA केलंय. याचदरम्यान त्यांना इंडियन नॅशनल थिएटर बेस्ट ऍक्टरचा अवॉर्ड मिळाला. त्यांनंतर त्यांनी जयमाला जोशींसोबत विवाह केला, त्यांना नियति जोशी आणि रित्विक जोशी अशी 2 मुलं आहेत. नुकतंच त्यांच्या मुलीचं नियतीचं लग्न झालंय. ज्याचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. इंस्टाग्रामवरही ते बरेच ऍक्टीव्ह आहेत. त्यांचे 1.8 मिलियन फॉलोअर्स आहेत. 2009 साली त्यांनी ट्विटरही जॉइन केलं, ज्यावर त्यांचे 123.7K फॉलोअर्स आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com