सोनाली कुलकर्णीने घेतला खास उखाणा, हनिमूननंतर थेट सासरच्या सेवेत.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sonalee kulkarni after honeymoon

सोनाली कुलकर्णीने घेतला खास उखाणा, हनिमूननंतर थेट सासरच्या सेवेत..

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) सध्या आपल्या पहिल्या-वहिल्या नवऱ्यासोबत दुसरं लग्न करुन हनिमूनसाठी मेक्सिकोला(Mexico) गेली होती . त्यांचे हे हनिमूनचे फोटो भलतेच गाजले. करोना काळात साधेपणाने लग्न केल्यामुळे सोनालीने पुन्हा एकदा कुणाल बेनोडेकर सोबत लग्नगाठ बांधली. हे लग्न दुबईत पार पडले. त्यानंतर बराच काळ ते दोघे मेक्सिको मध्ये हनिमून एन्जॉय करत होते. रोज नवे फोटो पाहून चाहतेही थक्क झाले होते. पण हनिमूननंतर सोनालीचा वेगळाच अंदाज समोर आला आहे. तिचा हा अवतार पाहून चाहत्यांचे डोळे फिरले आहे. (sonalee kulkarni after honeymoon)

हेही वाचा: PHOTO : अण्णांची शेवंता दुबईत करतेय धमाल

हेही वाचा: अभिनेता पुष्कर जोगच्या आईवर गुन्हा दाखल; शिक्षण क्षेत्रात मोठा गैरव्यवहार

कारण एरव्ही हॉट लुक मध्ये दिसणारी सोनाली चक्क सासरच्या सेवेत रमली आहे. याबाबत तिने स्वतः एक पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. कारण सोनालीने पहिल्यांदाच सासरी स्वयंपाक बनवला आहे. याचा फोटो शेअर करत सोनालीने एक खास कॅप्शन दिले आहे. 'सासरी केलेला पहिला पदार्थ, तांदळाची खीर”. असे सोनालीने लिहिले आहे., म्हणजे परंपरेनुसार पहिला गोड पदार्थ बनवून सोनालीने सासरच्या मंडळींना खुश केले आहे. यावेळी सोनालीचा लुक एखाद्या गृहिणीसारखा होता. कपाळावर कुंकू, गळ्यात मंगळसुत्र, कुर्ता असा वेगळाच लुक सोनालीचा पाहायला मिळाला.

सध्या सोनाली सासरी म्हणजेच तिच्या लंडनच्या घरी आहे. तिचा पती कुणाल हा लंडन मध्ये राहतो. सध्या सोनाली आपल्या नव्या कुटुंबासोबत एण्जॉय करताना दिसत आहे. यावेळी तिने एक खास उखाणाही घेतला आहे. सोनाली म्हणते, 'लग्नविधीं नंतर घातलेल्या मंगळसूत्राच्या उलट्या वाट्या.. कुणालच्या घरच्यांसाठी आणल्या तांदळाच्या खीरीने भरलेल्या वाट्या.'

Web Title: Sonalee Kulkarni Made Sweet Dish For Kunal Benodekar After Honeymoon

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top