जेठालालच्या घराबाहेर बंदूक घेतलेली २५ माणसं! काय आहे प्रकरण? | Dilip Joshi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dilip Joshi

Dilip Joshi : जेठालालच्या घराबाहेर बंदूक घेतलेली २५ माणसं! काय आहे प्रकरण?

Dilip Joshi Tarak Mehata Ka oolta Chashmah : टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये ज्या मालिकेची सर्वाधिक चर्चा असते त्या तारक मेहता का उल्टा चष्मानं प्रेक्षकांची अमाप लोकप्रियता मिळवली आहे. आता त्या मालिकेतील सर्वाधिक प्रसिद्घ कलाकाराची धक्कादायक बातमी समोर आली आहे. जेठालाल उर्फ दिलीप जोशींनी चाहत्यांना तो घाबरवणारा अनुभव सांगितला आहे.

त्याचे झाले असे की नागपूर कंट्रोल रुममधून एका अज्ञातानं फोन केला होता. त्यानं सांगितलं की, तारक मेहता का उल्टा चष्मा मध्ये दिलीप जोशी नावाचे कलाकार कुणी काम करतात त्यांच्याविषयी धक्कादायक बातमी आहे. शिवाजी पार्कमध्ये जेठालाल यांचे जे घर आहे त्या घराबाहेर २५ लोग उभे आहेत. त्यांच्याकडे बंदुक आणि वेगवेगळी हत्यारं आहेत. असे त्या व्यक्तीनं सांगितले होते.

Also Read - बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

तारक मेहतामध्ये जेठालालची भूमिका करणाऱ्या दिलीप जोशी यांचा चाहतावर्ग मोठा आहे. त्यांची प्रसिद्धी केवळ भारतातच नाहीतर जगभरामध्ये त्या मालिकेचा चाहतावर्ग आहे. अशावेळी सोशल मीडियावर तारक मेहताची नेहमीच चर्चा होत असते. आता तर दिलीप जोशींच्या त्या बातमीनं चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांनी पोलिसांकडे याबाबत तक्रार दिली आहे. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी, अमिताभ बच्चन, धर्मेंद्र यांचे घरही बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती.

त्या अज्ञात कॉलरनं सांगितलं की, त्यानं काही लोकांना मुंबईमध्ये काही घातपात कारवाया करण्यासंबंधी चर्चा करताना ऐकलं होतं. त्यात तारक मेहताच्या दिलीप जोशींच्या नावाचा उल्लेख होता. याप्रकरणी जोशी यांना मुंबईतील शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. तपासानंतर काही गोष्टी समोर आल्या आहेत.

वास्तविक दिल्लीच्या एका सिम कार्ड कंपनीमध्ये काम करणाऱ्या एका मुलानं अॅपच्या माध्यमातून तो फोन केला होता. आता पोलीस ज्या व्यक्तीनं कॉल केला होता त्याचा शोध पोलीस घेत आहे. दरम्यानच्या काळात दिलीप जोशी यांच्याविषयीची ती बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली असून त्यांच्या चाहत्यांनी याबाबत काळजी व्यक्त केली आहे.

तो फोन आल्यानंतर सुप्रीम कोर्टानं मुकेश अंबानी आणि त्यांच्या परिवाराला भारतात आणि परदेशात झेड प्लस सुरक्षा देण्यात आली होती. झेड प्लस ही सर्वोच्च स्तराची सुरक्षायंत्रणा आहे. कोर्टानं अंबानींना त्या सुरक्षायंत्रणेचा खर्च करण्यास सांगितले होते.