Salman Khan : 'माझ्यासाठी ऐश्वर्या ही नेहमीच...' करण जोहर समोर सलमान बोलून गेला!

बॉलीवूडचा भाईजान हा त्याच्या आक्रमक स्वभावामुळे त्याच्या चाहत्यांना माहिती आहे. एकदा का सलमानला राग आला की तो रागाच्या भरात काय करेल याचा त्यालाच अंदाज नसतो.
Salman Khan and Aishwarya
Salman Khan and Aishwarya esakal

Salman Khan On Aishwarya Rai : बॉलीवूडचा भाईजान हा त्याच्या आक्रमक स्वभावामुळे त्याच्या चाहत्यांना माहिती आहे. एकदा का सलमानला राग आला की तो रागाच्या भरात काय करेल याचा त्यालाच अंदाज नसतो. म्हणून की काय आतापर्यत त्याला त्या रागाची मोठी किंमत चुकवावी लागली आहे.

एका शोमध्ये करण जोहरनं जेव्हा सलमान खानला विश्वसुंदरी आणि सलमान खानची एकेकाळची गर्लफ्रेंड ऐश्वर्या रॉयबद्दल प्रश्न विचारला तेव्हा त्याचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. करण जोहरनं यापूर्वी देखील सलमानला ऐश्वर्यावरुन वाद होतील असे प्रश्न विचारले आहेत. मात्र त्यावर सलमाननं बिनधास्तपणे उत्तर देत करणला गप्प केले आहे. त्या शोमध्ये सुद्धा भाईजानची दबंगगिरी पाहायला मिळाली.

Also Read - बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

बॉलीवूडमध्ये ज्या लवस्टोरीची सर्वाधिक चर्चा झाली त्यात सलमान आणि ऐश्वर्याचे नाव नेहमीच घेतले जाते. त्या दोघांमधील भांडणानंतर त्यांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ते कधीही एकत्र दिसले नाहीत. ना त्यांनी कधी एकमेकांशी बोलण्याचा प्रयत्न केला. वेगवेगळ्या शोमध्ये ते समोरासमोर आले तेव्हा त्या फोटोचीच चर्चा मोठ्या प्रमाणावर झाली होती.

Salman Khan and Aishwarya
Akshay Kumar: नरेंद्र मोदींना 'तो' प्रश्न विचारून ट्रोल झाला होता अक्षय..आता म्हणतोय,'मला PMO ऑफिसमधूनच..'

काही दिवसांपूर्वी एका वेडिंग शो मध्ये ऐश्वर्या आणि सलमान हे एकमेकांसमोर आल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये सलमान एकटक ऐश्वर्याकडे पाहत होता. त्यावेळी ऐश्वर्यानं त्याला हात उंचावून प्रतिसाद दिला होता. त्या व्हिडिओची सर्वाधिक चर्चा झाली होती. आता करण जोहरनं एका शो मध्ये सलमान खानला जो प्रश्न विचारला होता त्यावरुन त्यानं दिलेली प्रतिक्रिया पुन्हा एकदा नेटकऱ्यांच्या चर्चेला उधाण आले आहे.

करणनं सलमानला त्याच्या दोन्ही एक्स गर्लफ्रेंडवरुन प्रश्न विचारला होता. तो असा की, त्या दोघींमध्ये सर्वात सुंदर कोण आहे, करणच्या प्रसिद्ध कॉफी विथ करणमध्ये करणनं सलमानला त्या दोघींच्या नावावरुन छेडले होते. त्यावर सलमाननं दिलेलं उत्तर मात्र त्याच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरलं आहे. त्यांनी भाईजानवर कौतूकाचा वर्षाव केला होता.

Salman Khan and Aishwarya
Nora Fatehi : 'तेरी नजर का कसूर है!'

सलमान म्हणाला, मला कतरिना आणि ऐश्वर्या यांच्यात कोण सुंदर असं जेव्हा विचारलं तेव्हा मी सांगेल की, ऐश्वर्या ही नेहमीच माझी फेव्हरेट राहिली आहे. ती खूप चांगली अभिनेत्री आहे. तिच्या सौंदर्यापुढे कतरिना फिकी आहे. हे मला सांगावे लागेल. सलमानच्या आगामी टायगर ३ चित्रपटामध्ये कतरिना ही महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com