दिलीप कुमार यांचा रुग्णालयातील फोटो आला समोर

सायरा बानो यांची चाहत्यांना विनंती
Dilip kumar,Saira Banu
Dilip kumar,Saira Banufile image

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार Dilip Kumar यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोमवारी संध्याकाळी त्यांचा रुग्णालयातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. दिलीप कुमार यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर हा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने दिलीप कुमार यांना रविवारी सकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना बायलॅटरल प्लुरल इफ्युजनचा त्रास असून डॉक्टर त्यावर उपचार करत असल्याची माहिती देण्यात आली. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये दिलीप कुमार यांच्यासोबत पत्नी सायरा बानो Saira Banu दिसत आहेत. त्यांच्या प्रकृतीविषयी पसरणाऱ्या कोणत्याच अफवांवर विश्वास ठेवू नका, अशी विनंती त्यांनी चाहत्यांना केली आहे. (Dilip Kumar photo from hospital shared online Saira Banu requests fans to not believe rumours)

'गेल्या काही दिवसांपासून माझे प्रिय पती युसुफ खान यांची प्रकृती ठीक नसून मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या तब्येतीसाठी प्रार्थना करणाऱ्यांचे मी मनापासून आभार मानते. माझे पती, माझे कोहिनूर, दिलीप कुमार साहब यांची प्रकृती आता स्थिर आहे आणि त्यांना लवकरच डिस्चार्ज मिळेल अशी माहिती मला डॉक्टरांनी दिली आहे. कोणत्याच अफवांवर विश्वास ठेवू नका अशी मी तुम्हाला विनंती करते. त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याची विनंती करतानाच मीसुद्धा या कोरोना काळात तुम्हा सर्वांच्या स्वास्थ्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी देवाकडे प्रार्थना करते', असं त्यांनी लिहिलं.

Dilip kumar,Saira Banu
Indian Idol 12 : शन्मुखप्रियाला का होतोय इतका विरोध?

दिलीप कुमार यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर जलिल पारकर यांनी सोमवारी त्यांच्या प्रकृतीविषयीचे अपडेट्स दिले. 'दिलीप साहब हे व्हेंटिलेटरवर नसून ऑक्सिजन सपोर्टवर आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. आम्ही काही चाचण्यांच्या रिपोर्ट्सची वाट पाहत आहोत', असं ते म्हणाले.

Dilip kumar,Saira Banu
रिजेक्ट केलेल्या मॅगझिननेच आज कव्हरपेजवर दिलं सोनू सूदला स्थान

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com