अभिनेते दिलीप कुमार यांनी पेशावरमधील वडिलोपार्जित घराच्या आठवणीत चाहत्यांना केली खास विनंती

dilip kumar
dilip kumar

मुंबई- ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार आणि राज कपूर यांचं पाकिस्तानमधील पेशावर मध्ये असलेलं वडिलोपार्जित घर जतन करण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारने घेतला आहे. या दोन्ही कलाकारांचा जन्म पाकिस्तानमधील त्यांच्या हवेलीमध्ये झाला होता. आपल्या बालपणीचे दिवस आठवत अभिनेते दिलीप कुमार यांनी पाकिस्तानी चाहत्यांना एक खास विनंती केलं आहे. 

अभिनेते दिलीप कुमार यांनी त्यांच्या भावना सोशल मिडियावर व्यक्त केल्या आहेत. त्यांनी पाकिस्तानमधील त्यांच्या चाहत्यांना एक विनंती केली आहे की त्यांच्या घराचे काही फोटो काढुन पोस्ट करा आणि त्यांना टॅग करा. याव्यतिरिक्त दिलीप कुमार यांनी पाकिस्तानमधील त्यांच्या हवेलीचे काही फोटो देखील शेअर केले आहेत.

दिलीप कुमार यांनी आणखी एका पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधुन घेतलंय. त्यांनी एक फोटो पोस्ट केला आहे ज्यामध्ये ते त्यांच्या आवडत्या गुलाबी रंगाचं शर्ट घातलेले दिसून येत आहेत. या फोटोमध्ये दिलीप कुमार त्यांची पत्नी सायरा बानोसोबत आहेत. हा फोटो पोस्ट करत दिलीप कुमार यांनी लिहिलंय, 'गुलाबी, आवडतं शर्ट, परमेश्वराची कृपा अशी आमच्यावर सदैव असू दे.'

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं वडिलोपार्जित घर पाकिस्तानमधील पेशावरमध्ये आहे. याच मोठ्या हवेलीमध्ये दिलीप कुमार यांचा जन्म झाला होता आणि बालपण देखील गेलेलं. पाकिस्तानच्या पुरातत्व विभागाने सांगितलं की 'दोन्ही कलाकारांच्या बंद पडलेल्या घराचं जतन करत त्यात संग्रहायल बनवलं जाईल जिथे या कलाकारांव्यतिरिक्त आणखी एक बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानशी संबंधित काही वस्तु देखील जतन केली जाईल. पुरातत्व आणि संग्रहायल विभागाचे निर्देशक डॉक्टर अब्दुल समद यांनी पेशावरच्या आयुक्तांना पत्र पाठवलं आहे ज्यामध्ये म्हटलंय की विभाग या स्थळांना जतन करण्याची घोषणा करु इच्छित आहे.'  

dilip kumar requests fans in peshawar share pictures of my ancestral house  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com