esakal | दिलीप कुमार यांचं अधिकृत ट्विटर अकाऊंट होणार बंद
sakal

बोलून बातमी शोधा

Dilip-Kumar-and-Saira-Banu

दिलीप कुमार यांचं अधिकृत ट्विटर अकाऊंट होणार बंद

sakal_logo
By
स्वाती वेमूल

दिवंगत अभिनेते दिलीप कुमार Dilip Kumar यांचं अधिकृत ट्विटर अकाऊंट बंद होणार आहे. दिलीप कुमार आणि सायरा बानू यांचे निकटवर्तीय फैसल फारुखी हे आतापर्यंत ट्विटर अकाऊंट सांभाळत होते. बुधवारी ट्विट करत त्यांनी अकाऊंट बंद करणार असल्याची माहिती दिली. दिलीप कुमार यांचे ७ जुलै रोजी निधन झाले. ते ९८ वर्षांचे होते. दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानू Saira Banu यांच्या संमतीनंतरच ट्विटर अकाऊंट बंद करत असल्याचं फारूखी यांनी सांगितलं.

'बरीच चर्चा आणि विचारविनिमयानंतर, सायरा बानूजी यांच्या संमतीने, मी दिलीप कुमार साहब यांचं हे ट्विटर अकाऊंट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तुमच्या निरंतर प्रेमासाठी आणि समर्थनाबद्दल धन्यवाद,' असं ट्विट त्यांनी बुधवारी केलंय. या ट्विटर अकाऊंटवरून दिलीप कुमार यांच्या आरोग्याविषयीची माहिती देण्यात येत होती. त्यांच्या निधनानंतर अखेर हा अकाऊंट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिलीप कुमार यांचं अधिकृत ट्विटर अकाऊंट हे नोव्हेंबर २०११ मध्ये सुरू करण्यात आलं होतं. आतापर्यंत या अकाऊंटला सहा लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी फॉलो केलं आहे.

हेही वाचा: ''केबीसी'मध्ये विचारलेला प्रश्न चुकीचा, उत्तरही चुकीचं'; प्रेक्षकाचा दावा

सायरा बानू यांना काही दिवसांपूर्वीच मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रक्तदाब आणि शुगरच्या समस्येमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. ७७ वर्षीय सायरा बानू या नैराश्यात असल्याचंही डॉक्टरांनी यावेळी सांगितलं. दिलीप कुमार यांच्या निधनाने सायरा बानो खूप खचल्या होत्या. दिलीप कुमार यांच्या प्रत्येक सुखदु:खात सावलीप्रमाणे त्यांच्या पाठीशी त्या उभ्या राहिल्या.

loading image
go to top