esakal | ''केबीसी'मध्ये विचारलेला प्रश्न चुकीचा, उत्तरही चुकीचं'; प्रेक्षकाचा दावा
sakal

बोलून बातमी शोधा

amitabh bachchan with kbc producar

''केबीसी'मध्ये विचारलेला प्रश्न चुकीचा, उत्तरही चुकीचं'; प्रेक्षकाचा दावा

sakal_logo
By
स्वाती वेमूल

'कौन बनेगा करोडपती'च्या Kaun Banega Crorepati तेराव्या सिझनमधील नुकत्याच पार पडलेल्या एका एपिसोडमध्ये स्पर्धकाला विचारलेला प्रश्न आणि त्यावर दाखवलेलं उत्तर चुकीचे असल्याचा दावा एका प्रेक्षकाने केला आहे. यावर आता केबीसीचे निर्माते सिद्धार्थ बासू producer Siddhartha Basu यांनी ट्विटरवर संबंधित प्रेक्षकाला उत्तर दिलं आहे. 'कोणतीही चूक झालेली नाही', असं त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलंय.

शोचे सूत्रसंचालक अमिताभ बच्चन Amitabh Bachchan यांनी स्पर्धक दीप्ती तुपे यांना प्रश्न विचारला. "साधारणपणे, भारतीय संसदेची प्रत्येक बैठक कशाने सुरू होते?" यावर अचूक उत्तर ‘प्रश्नोत्तराचा तास’ असल्याचं दाखवण्यात आलं. याचा स्क्रीनशॉट पोस्ट करत प्रेक्षकाने ट्विट केलं, 'आजच्या एपिसोडमध्ये विचारलेला प्रश्न आणि दाखवलेलं उत्तर दोन्हीही चुकीचे होते. मी टीव्हीवर संसदेच्या अनेक बैठका पाहिल्या आहेत. लोकसभेची बैठक सामान्यपणे शून्य तासाने सुरू होते आणि राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासाने बैठकीची सुरुवात होते. कृपया तपासून पहा.'

केबीसी निर्मात्यांचं उत्तर-

'कोणतीही चूक झालेली नाही. लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्यांसाठी असलेले हँडबुक तुम्ही तपासून पहा. दोन्ही सभागृहांमध्ये स्पीकर किंवा अध्यक्षांनी विशेष निर्देश दिलेले नसतील तर, सर्वसाधारपणे बैठका या प्रश्नोत्तराच्या तासाने सुरू होतात. त्यानंतर शून्य तास सुरू होतो.'

सिद्धार्थ बासू यांच्या या उत्तरावर संबंधित प्रेक्षकाने पुन्हा ट्विट करत लिहिलं, 'बासू, तुम्ही दिलेल्या उत्तरासाठी धन्यवाद. मी लोकसभा आणि राज्यसभेच्या वेबसाइट्सवर माहिती तपासून पाहिली. दोन स्क्रीनशॉट्समधून स्पष्ट होतंय की प्रश्न आणि उत्तर दोन्ही चुकीचे होते. राज्यसभेची बैठक सकाळी ११ वाजता सुरू होते हे नमूद करणे आवश्यक आहे.'

हेही वाचा: सोनमला निर्लज्ज म्हणणाऱ्याला अनिल कपूर यांचं विनम्रतेने उत्तर

हेही वाचा: मुनमुनसोबत अफेअरच्या चर्चांवर राजचं सडेतोड उत्तर

कौन बनेगा करोडपती हा लोकप्रिय शो २००० साली सर्वांत पहिल्यांदा प्रसारित झाला. या शोला आता २१ वर्षे पूर्ण झाली आहेत. सुरुवातीला बक्षिसाची अंतिम रक्कम ही एक कोटी रुपये इतकी होती. आता ती रक्कम वाढवून सात कोटी रुपये इतकी करण्यात आली आहे. या शोवर काही प्रेक्षकांनी आरोप केले होते. टीआरपीसाठी भावनिक कथा अधिक दाखवल्या जात आहेत, असं प्रेक्षकांनी म्हटलं होतं. त्यावर निर्माते सिद्धार्थ यांनी उत्तर दिलं होतं. 'टीआरपी रेटिंगसाठी कोणच्याही भावनांचा वापर केला नाही', असं त्यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं.

loading image
go to top