DDLJ: गर्लफ्रेंड असेल तर तिला घेऊन जा... दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे पुन्हा होतोय रिलीज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

DDLJ, DDLJ release again

DDLJ: गर्लफ्रेंड असेल तर तिला घेऊन जा... दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे पुन्हा होतोय रिलीज

DDLJ Release Again: अगर वो तुझसे प्यार करती है तो वो पलट के देखेगी.. जा सिमरन जिले अपनी जिंदगी.. अशा एक से बढकर एक संवादांनी लोकांच्या मनात घर केलेला सिनेमा म्हणजे दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे. DDLJ अशी ओळख असलेला सिनेमा प्रेमाच्या माहोलमध्ये पुन्हा रिलीज होतोय. त्यामुळे प्रेमात आकंठ बुडालेल्या राज - सिमरन साठी मोठी पर्वणी असणार आहे.

(Dilwale Dulhaniya Le Jayenge Re-Releasing on Valentine's Day)

दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे संपूर्ण भारतात पुन्हा रिलीज होतोय. शाहरुख खान आणि काजोलची प्रमुख भूमिका असलेला DDLJ व्हॅलेंटाईन वीकचा मुर्हूत साधत पुन्हा रिलीज होतोय. आज १० फेब्रुवारीला भारतातील PVR , INOX आणि CINEPOLIS अशा थियेटरमध्ये DDLJ प्रदर्शित होतेय. त्यामुळे सर्व सिनेरसिकांसाठी आणि प्रेमी युगुलांसाठी व्हॅलेंटाईन वीकमध्ये DDLJ पाहणं खास असणार आहे.

DDLJ मुंबई, पुणे, अहमदाबाद, सुरत, वडोदरा, गुडगाव, फरिदाबाद, लखनौ, नोएडा, डेहराडून, दिल्ली, चंदीगड, कोलकाता, गुवाहाटी, बेंगळुरू, हैदराबाद, इंदूर, चेन्नई, वेल्लोर आणि त्रिवेंद्रम यासह भारतातील 37 शहरांमध्ये प्रदर्शित होईल.

मुंबईतील मराठा मंदिर मध्ये २५ वर्षांहून जास्त काळ DDLJ दाखवण्यात येतोय. पण आता शाहरुखच्या पठाण सोबत शाहरुख - काजोलचा DDLJ प्रेक्षक बघू शकतात. व्हॅलेंटाईन डे निमित्त्ताने DDLJ हा सिनेमा फक्त १ आठवडा थियेटरमध्ये असणार आहे.

२० ऑक्टोबर १९९५ ला दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे सिनेमा रिलीज झाला. सिनेमा रिलिज होऊन आता २५ पेक्षा जास्त वर्ष झाली आहेत. आजही या सिनेमाची क्रेझ कमी झाली नाहीये. सिनेमाच्या रिलीजपासून हा सिनेमा मुंबई सेंट्रलच्या मराठा मंदिर मध्ये सुरु आहे. आता भारतभरातील प्रेक्षकांना राज - सिमरनची लव्हस्टोरी पुन्हा एकदा एन्जॉय करायला मिळणार आहे.

टॅग्स :Shah Rukh Khankajol