रामायणातील सीतेनं स्वातंत्र्यदिनाची पोस्ट टॅग केली Pak PMO ना,पुढे जे झालं ते..

दीपिका चिखलिया यांनी स्वातंत्र्यदिनाची पोस्ट नरेंद्र मोदी यांना टॅग न करता चुकून पाकिस्तानी पंतप्रधानांच्या ट्वीटर हॅंडलला टॅग केली आहे.
Dipika Chikhlia trolled for tagging independence day post to Pakistan PMO
Dipika Chikhlia trolled for tagging independence day post to Pakistan PMOGoogle

Dipika Chikhlia trolled for tagging independence day post to Pakistan PMO: आज संपूर्ण भारतात स्वातंत्र्याचा महोत्सव साजरा केला जात आहे. १५ ऑगस्ट २०२२ हे साल आपल्या सर्व भारतवासियांसाठी खास आहे. कारण याच दिवशी आपण स्वातंत्र्याची ७५ वर्ष पूर्ण केली आहेत. देशभरात आज घराघरात तिरंगा फडकवला गेला आहे. त्यातच सरकारने देखील हर घर तिरंगा अभियानाची सुरुवात केली आहे. सर्वसामान्य लोकांसोबत बॉलीवूड आणि छोट्या पडद्यावरच्या सेलिब्रिटींनी देखील आपल्या घरात तिरंगा फडकवला आहे. रामायणात सीतेची भूमिका करणाऱ्या दीपिका चिखलिया (Dipika Chikhlia) यांच्याकडून मात्र आजच्या दिवशी चुकून एक चूक घडली.

Dipika Chikhlia trolled for tagging independence day post to Pakistan PMO
75th Independence Day: देशभक्तीत न्हाऊन निघाले बॉलीवूडकर,दिला एकतेचा संदेश

दीपिका चिखलियाने ट्वीटरवर हातात झेंडा पकडत एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्यांनी पांढरा शुभ्र कुर्ता आणि पलाझो पॅंट असलेला सूट घातला आहे. त्यांच्या हातात भारताचा झेंडा आहे. दीपिका यांनी फोटो शेअर करत लिहिलं आहे, ''७५ व्या स्वातंत्र्या दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा''. परंतु त्यांनी चुकीनं ती पोस्ट भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग न करता पाकिस्तानी पंतप्रधानांच्या ट्वीटर हॅंडलला टॅग केली आहे.

आता दीपिका यांच्याकडून चुकू झाली तर ट्रोलर्स थोडीच सोडणार आहेत त्यांना. दीपिका यांच्या फोटोवर ट्रोलर्सनी मीम्स शेअर करायला सुरुवात केली आहे. एका नेटकऱ्याने डोळे बंद करुन निशाणेबाजी करतात त्या व्यक्तीचा फोटो शेअर करत लिहिलं आहे,'पीएमचं ट्वीटर हॅंडल शोधताना'. दुसऱ्यानं लिहिलं आहे, 'मित्रा रिलॅक्स. पाकिस्तान देखील भारताचाच एक भाग होता'. तर एका नेटकऱ्याने लक्ष्मणचा फोटो शेअर केला आहे. यातील लक्ष्मण बोलताना दिसतोय, 'हे प्रभू, मला ही काहीतरी मायावी शक्ती आहे असं वाटत आहे'.

दीपिका चिखलिया यांना रामानंद सागर यांच्या १९८७ साली प्रसारीत झालेल्या 'रामायण' मालिकेपासून ओळख मिळाली. त्यांनी या मालिकेत सीतेची भूमिका साकारली होती. त्यांच्यासोबत अरुण गोविल यांनी रामाची व्यक्तिरेखा साकारली होती. दीपिका यांना काही वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या आयुष्यमान खुरानाच्या 'बाला' सिनेमात पाहिलं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com