'रामायण'मध्ये सीतेची भूमिका साकारणा-या दीपिका चिखलिया यांच्या आईचं निधन

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Saturday, 12 September 2020

रामानंद सागर यांच्या 'रामायण'मध्ये सीतेची भूमिका साकारणा-या अभिनेत्री दीपिका चिखलिया यांच्या आईचं निधन झालं आहे. दीपिका यांनी स्वतः सोशल मिडियावर भावूक पोस्ट शेअर करत याविषयीची माहिती दिली आहे. 

मुंबई-  सिनेसृष्ट्रीतून या वर्षात अनेक दुःखद बातम्या ऐकायला मिळत आहेत. या वर्षी अनेक लोकप्रिय सेलिब्रिटींनी जगाचा निरोप घेतला. आज सकाळीच अनुराधा पौडवाल यांच्या मुलाच्या निधनाची बातमी आली असताना आता अभिनेत्री दीपिका चिखलियाच्या आईची दुःखद बातमी आली आहे. रामानंद सागर यांच्या 'रामायण'मध्ये सीतेची भूमिका साकारणा-या अभिनेत्री दीपिका चिखलिया यांच्या आईचं निधन झालं आहे. दीपिका यांनी स्वतः सोशल मिडियावर भावूक पोस्ट शेअर करत याविषयीची माहिती दिली आहे. 

हे ही वाचा: आयुष्मान खुराना बनला यूनिसेफ सेलिब्रिटी एडवोकेट, या पदावर असणा-या व्यक्तीला कोणत्या जबाबदा-या पार पाडाव्या लागतात?

दीपिका यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलंय, 'तुमच्या आई-वडिलांचं या जगातून निघून जाणं हे एक असं दुःख आहे ज्यावर मात करणं सोपं नाही. यासोबतं त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय, RIP माँ.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Mum RIP

A post shared by Dipika (@dipikachikhliatopiwala) on

दीपिका यांच्या पोस्टमधून हे स्पष्ट दिसून येत आहे की त्या त्यांच्या आईच्या जाण्याने पूर्णपणे तुटल्या आहेत. हे दुःख त्यांना सहन करण्याच्या पलीकडे आहे. दीपिका यांच्या या पोस्टवर त्यांचे चाहते आणि मित्रपरिवार शोक व्यक्त करत आहेत. सगळेचजण त्यांच्या या पोस्टवर कमेंट करुन त्यांच्या आईच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी प्रार्थना करत आहेत.

दीपिका चिखलिया रामानंद सागर यांच्या रामायण या टीव्ही शोमध्ये सीतेची भूमिका साकारल्याने प्रसिद्ध झाल्या होत्या. लॉकडाऊन दरम्यान जेव्हा पुन्हा एकदा या टीव्ही शोचं प्रक्षेपण करण्यात आलं तेव्हा दीपिका पुन्हा एकदा चर्चेत आल्या होत्या. त्या सोशल मिडियावर देखील ऍक्टीव्ह असतात आणि त्यांच्या चाहत्यांसोबत जुन्या आठवणींना उजाळा देतात.  

dipika chikhlia who played sita in ramanand sagar ramayan is grieving the demise of her mother  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dipika chikhlia who played sita in ramanand sagar ramayan is grieving the demise of her mother