दीपिका कक्कर 'बिग बॉस 12' ची विजेती

सोमवार, 31 डिसेंबर 2018

'बिग बॉस 12' चा फिनाले काल रविवारी 30 डिसेंबर रोजी रंगला होता. या पर्वाचा विजेता कोण याची उत्सुकता शोच्या चाहत्यांना लागून होती. अखेर दीपिकानं श्रीसंतला टक्कर देत बिस बॉसच्या विजेतेपदावर आपलं नावं कोरलं. सलग 105 दिवस उत्तम खेळी करत दीपिका या घरात टिकून होती. त्यामुळे घरातील इतर मंडळींचाच नाही तर चाहत्यांचाही तिला मोठा पाठिंबा होता.

मुंबई-  'बिग बॉस 12' चा फिनाले काल रविवारी 30 डिसेंबर रोजी रंगला होता. या पर्वाचा विजेता कोण याची उत्सुकता शोच्या चाहत्यांना लागून होती. अखेर दीपिकानं श्रीसंतला टक्कर देत बिस बॉसच्या विजेतेपदावर आपलं नावं कोरलं. सलग 105 दिवस उत्तम खेळी करत दीपिका या घरात टिकून होती. त्यामुळे घरातील इतर मंडळींचाच नाही तर चाहत्यांचाही तिला मोठा पाठिंबा होता.

छोट्या पडद्यावरची आदर्श सून आणि ससुराल सिमर का फेम दीपिका कक्कर बिग बॉस 12ची विजेती ठरली आहे. करणवीर बोहरा, दीपक ठाकूर, श्रीशांत या विजेतपदाच्या प्रबळ दावेदारांना मात देत दीपिकानं बिग बॉस 12 स्पर्धा जिंकली आहे. अंतिम फेरीत दीपिका आणि श्रीसंत या दोघांमध्ये चुरस पाहायला मिळाली अखेर दीपिकानं या खेळात बाजी मारली.
 

दीपिका आणि श्रीसंत यांनी शेवटपर्यंत उत्तम खेळी केली. दीपिका श्रीशांतला तिचा भाऊ मानते, त्यामुळे अंतीम स्पर्धा ही खऱ्या अर्थानं बहिण भावामध्ये रंगली. पण, अखेर या खेळात दीपिकाची सरशी झाली. दीपिकाने बिग बॉसची ट्रॉफी आणि 30 लाख रूपये जिंकले. माजी क्रिकेटपटू श्रीसंत शोचा रनरअप ठरला. एकीकडे शो जिंकल्याने दीपिका आनंदात आहे तर श्रीसंत दु:खी. श्रीसंतचे चाहते तर या पराभवाने चांगलेच संतापले आहेत.
 

या स्पर्धेतून दीपक ठाकूरने 20 लाख रूपये घेऊन शोमधून बाहेर होणे पसंत केले होते. यानंतर करणवीर आणि रोमिल हे दोघे एलिमिनेट झालेत. यापश्चात दीपिका आणि श्रीसंत यांच्यात विजेतेपदासाठी चुरस होती. मात्र श्रीसंतला मागे टाकत दीपिकाने बाजी मारली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dipika Kakar Wins Bigg Boss 12