दिग्दर्शक अनुभव सिन्हांसोबत 'या' दिग्दर्शकांनीही केलं बॉलीवूडला अलविदा..

anubhav sinha
anubhav sinha

मुंबई- बॉलीवूडमध्ये सध्या घराणेशाहीवरुन वाद सुरु आहेत. याच वादामुळे दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी बॉलीवूडमधून काढता पाय घेतला आहे. अनुभव सिन्हा यांच्या त्यांच्या ट्विटवरवरुन याबाबत माहिती दिली आहे. केवळ ही माहिती देऊन ते थांबले नाहीत तर त्यांनी त्यांच्या नावापुढे 'नॉट बॉलीवूड' असं देखील लिहून अपडेट केलं आहे. तसंच त्यांच्या वैयक्तिक माहितीमध्ये देखील त्यांनी ते बॉलीवूडचे दिग्दर्शक आहेत असं कुठेच लिहिलेलं नाही. 

दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी ट्विट करत लिहिलं आहे की, 'बस्स आता खुप झालं. मी बॉलीवूडमधून बाहेर पडत आहे.' अनुभव सिन्हा यांच्या या मोहिमेला अनेक दिग्दर्शकांनी समर्थन दिलं आहे.

सुधीर मिश्रा यांनी ट्विट करत म्हटलंय, 'माझ्या नजरेत तर कधी बॉलीवूड नव्हतंच. मी तर केवळ या इंडस्ट्रीमध्ये चांगले सिनेमे बनवण्यासाठी आलो होतो.'

तर दुसरीकडे हंसल मेहता यांनी ट्विट करुन लिहिलं आहे की, 'मी बॉलीवूड सोडलं आहे. मात्र हे याआधीही कधी अस्तित्वात नव्हतं.'

दोघांच्या या ट्विटवर अनुभव सिन्हा यांनी लिहिलंय, 'चला आणखी एक सोडून गेला. माझ्या भावा-बहिणींनो ऐका आता जेव्हा पण तुम्ही बॉलीवूडबद्दल चर्चा कराल तेव्हा तुम्ही आमच्या बद्दल बोलत नसाल.' 

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर लगेचच बॉलीवूडमधील घराणेशाहीचा मुद्द्यावरुन एकमेकांवर आगपाखड होऊ लागली. कंगना रनौतने तर सोशल मिडियावर एक वेगळीच मोहिम सुरु केली आहे. तिने सोनम कपूर, सोनाक्षी सिन्हा, करण जोहर, महेश भट्ट, तापसी पन्नू, स्वरा भास्कर यांच्या विरोधात मोर्चाच सुरु केला आहे. तर दुसरीकडे सोशल मिडियावर युजर्स देखील स्टारकिड्सच्या विरोधात आवाजा उठवताना दिसत आहेत. 

घराणेशाही, इनसाईडर-आऊटसाईडरच्या या वादांमध्ये बॉलीवूडे दोन भागांमध्ये विभागला गेला आहे. त्यात आता अनुभव सिन्हा यांनी स्वतःला या ट्रोलिंग पासून वाचवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी 'आर्टिकल 15, 'मुल्क', 'थप्पड' सारखे दर्जेदार सिनेमे दिले आहेत.   

director anubhav sinha and two more directors resigns from bollywood  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com