esakal | स्वराने केंद्र सरकारवर निशाणा साधताच भडकले दिग्दर्शक

बोलून बातमी शोधा

swara bhasker and ashoke pandit

स्वराने केंद्र सरकारवर निशाणा साधताच भडकले दिग्दर्शक

sakal_logo
By
टीम ई सकाळ

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर सोशल मीडियावर सक्रिय असते. सरकारबद्दल तसेच देशात सुरू असलेल्या घडामोडींबद्दल तिचे मत सोशल मीडियावर ती शेअर करत असते. स्वराने सरकारबद्दल नुकतेच एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये तिने प्रसिद्ध गायक अरिजित सिंगचे ‘आज फिर तुम पे’ या गाण्यातील ‘ना फिकर, ना शर्म, ना लिहाज’ या ओळी शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले, 'हे गाणं केंद्र सरकारसाठी आहे, ज्यांनी जबरदस्त आदेश काढले आहेत.’

स्वराच्या या ट्विटवर दिग्दर्शक अशोक पंडित यांनी कमेंट केली आहे. "असंच कुढत राहा, जळत राहा, फ्रस्ट्रेट होत राहा, आपले केस उपटत राहा, राज्य तर मोदीच करणार! कारण आता नक्षल्यांचे दिवस कायमचे भरले आहेत. झोपा नाहीतर रुबिका लियाकत येईल.’ अशोक पंडित यांच्या या ट्विटला अनेक नेटकऱ्यांनी लाईक करून रिट्विट केले आहे. एका नेटकऱ्याने कमेंट केली आहे, ‘जर यांना देशात एवढ्या समस्या आहेत तर दुसरीकडे कुठेतरी जाऊन स्थायिक व्हा!’

हेही वाचा : 'देशावर संकट आलं की हे पळ काढतात'; शाहरुखचं कुटुंब नेटकऱ्यांकडून ट्रोल

नुकतेच अभिनेत्री पूजा भटनेदेखील सरकारवर निशाणा साधत ट्विट केले. त्यामध्ये तिने लिहीले, "कोणाला जिवंत राहिल्याबद्दल अपराधीपणा वाटत आहे का? कारण मला वाटत आहे. जेव्हा कोणाचाही मृत्यू होतो, तेव्हा मला धक्का बसतो. सगळी व्यवस्था अयशस्वी झाली आहे. राजकीय वर्गाचे हात रक्ताने माखलेले आहेत. कारण, त्यांनी आधीपासून तयारी केली नाही, कारण सगळं ठीक आहे असा संदेश ते सारखा देत होते, कारण त्यांनी सगळं आपल्यावर सोडलं आहे.’