esakal | 'देशावर संकट आलं की हे पळ काढतात'; शाहरुखचं कुटुंब नेटकऱ्यांकडून ट्रोल

बोलून बातमी शोधा

shah rukh khan family
'देशावर संकट आलं की हे पळ काढतात'; शाहरुखचं कुटुंब नेटकऱ्यांकडून ट्रोल
sakal_logo
By
स्वाती वेमूल

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि पत्नी गौरी खान यांना बुधवारी रात्री उशिरा मुंबई विमानतळावर पाहिलं गेलं. गौरी आणि आर्यन न्यूयॉर्कला रवाना होण्यासाठी विमानतळावर पोहोचले होते. यावेळी पापाराझींनी त्यांचे फोटो आणि व्हिडीओ काढले आणि ते क्षणार्धात सोशल मीडियावर व्हायरल झाले. एकीकडे देशात कोरोनाचं संकट वाढत असताना शाहरुखचे कुटुंबीय परदेशी जात असल्याबद्दल नेटकऱ्यांनी राग व्यक्त केला.

खरंतर, शाहरुखची मुलगी सुहाना खान ही शिक्षणासाठी न्यूयॉर्कमध्ये एकटीच राहते. त्यामुळे तिला भेटण्यासाठी आई गौरी आणि भाऊ आर्यन न्यूयॉर्कसाठी रवाना झाले. 'देशातली परिस्थिती बिघडताच हे लोक परदेशी जातात,' अशी कमेंट एकाने केली. तर 'हे सेलिब्रिटी फक्त नावाला भारतीय आहेत. देशावर काही संकट आलं तर सर्वांत आधी हे देशाबाहेर पळ काढतात,' असं दुसऱ्याने सुनावलं. फक्त सामान्य लोकांसाठीच कठोर निर्बंध आहेत का, असाही सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा : महाराष्ट्राबाहेर होणार मराठी मालिकांचं शूटिंग

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटी हे मालदिव किंवा अन्य ठिकाणी फिरायला जात असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. एकीकडे कोरोनाचं संकट असताना सेलिब्रिटी व्हेकेशनचे फोटो सोशल मीडियावर कसे पोस्ट करू शकतात, असा प्रश्न उपस्थित करत नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला होता. रणबीर कपूर, आलिया भट्ट, दिशा पटानी, टायगर श्रॉफ, सारा अली खान, जान्हवी कपूर हे सेलिब्रिटी सध्या मालदिवला फिरायला गेले आहेत.