ऑस्करच्या स्पर्धेत दीपा मेहतांचा ‘फनी बॉय’

सकाळ ऑनलाईन टीम
Saturday, 31 October 2020

या अगोदर दीपा मेहता यांच्या ‘वॉटर’ या चित्रपटास २०१७ मध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट प्रवर्गात नामांकन मिळाले होते. ‘अर्थ’, ‘फायर’ हे त्यांनी दिग्दर्शित केलेले इतर दोन चित्रपट होते.

मुंबई - आपल्या आगळ्या वेगळ्या धाटणीच्या दिग्दर्शनासाठी प्रसिध्द असणा-या दीपा मेहता यांचा  ‘फनी बॉय’ आता ऑस्करच्या शर्यतीत आहे. विशेष म्हणजे त्यांच्या या चित्रपटाची ऑस्करसाठीची शिफारस ही कॅनडाकडून करण्यात आली आहे. पुढील वर्षाच्या १५ मार्चला ऑस्करची नामांकने जाहीर होणार असून पुरस्कार कार्यक्रम २५ एप्रिलला होणार आहे.

या अगोदर दीपा मेहता यांच्या ‘वॉटर’ या चित्रपटास २०१७ मध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट प्रवर्गात नामांकन मिळाले होते. ‘अर्थ’, ‘फायर’ हे त्यांनी दिग्दर्शित केलेले इतर दोन चित्रपट होते. त्या चित्रपटावर त्यावेळी धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी टीका करण्यात आली होती. इतकेच नव्हे तर या चित्रपटाला प्रदर्शित करण्यासही मोठ्या प्रमाणावर विरोध करण्यात आला होता. ‘फनी बॉय’ या चित्रपटाविषयी सांगायचे झाल्यास,  श्याम सेल्वादुराई यांच्या १९९४ मधील कादंबरीवर हा चित्रपट आधारित आहे. १९७० ते १९८० दरम्यान श्रीलंकेत घडलेली घटना चित्रपटात दाखविण्यात आली आहे. अरजी या तरुणाच्या लैंगिक जाणिवा वेगळ्या असतात ते यात दाखवले आहे. तामिळ व सिंहली यांच्यातील संघर्षांच्या काळात हा वयात आलेला मुलगा सामाजिक व कौटुंबिक जाचाला विरोध करतो असे त्यात दाखविण्यात आले आहे.

दीपा मेहता यांचा ‘फनी बॉय’ हा २००७ मधील ‘वॉटर’ प्रमाणेच वेगळी मांडणी करणारा चित्रपट असून त्यात एका वेगळ्या प्रकारचा विषय हाताळण्यात आला आहे. त्याला आंतरराष्ट्रीय चित्रपट गटात नामांकन मिळाले असल्याचे टेलेफिल्म कॅनडाच्या कार्यकारी संचालक ख्रिस्ता डिकेनसन यांनी सांगितले. या कॅटगिरीसाठी दीपा मेहता यांना दुसऱ्यांदा संधई मिळत आहे. १५ मार्चला ऑस्करची नामांकने जाहीर होणार आहेत. पुरस्कारप्रदान कार्यक्रम २५ एप्रिलला होणार आहे.

आंतरराष्ट्रीय ऑस्कर गटात कॅनडाकडून चित्रपट निर्मात्या दीपा मेहता यांचा ‘फनी बॉय’ हा चित्रपट पाठवण्यात आला आहे. अर्थात ९३ व्या ऑस्कर पुरस्कार कार्यक्रमात हा चित्रपट कॅनडाचे प्रतिनिधित्व करणार आहे.  दिल्लीत बालपण गेलेल्या मेहता या सध्या टोरांटोत  चित्रपट निर्मात्या आहेत.  डेव्हीड हॅमिल्टन व मी कॅनडातील परीक्षकांचे या निवडबद्दल आभारी आहोत, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Director deepa Mehta new movie funny boy now Oscar race